पुणे, 23 जानेवारी 2025- पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पाचव्या दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत सौरभ पवार 4-14) याने केलेल्या अचूक गोलंदाजीसह ऋषी नाळे(50धावा), अर्जुन वाघ(नाबाद 44) यांनी केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर पूना क्लब संघाने डेक्कन जिमखाना संघाचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
शिंदे हायस्कुल क्रिकेट मैदानावर झालेल्या या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत पूना क्लबच्या सौरभ पवार(4-14), धनराज परदेशी(2-21), निमीर जोशी(2-30) यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीपुढे डेक्कन जिमखाना संघाचा डाव 30.2 षटकात सर्वबाद 134धावावर संपुष्टात आला. यात देवराज बेद्रे 40, कपिल गायकवाड 31, सर्वेश सुर्वे 20 यांनी धावा केल्या. 134धावाचे आव्हन पूना क्लब संघाने 25.3 षटकात 3बाद 135धावा करून पूर्ण केले. सुरुवातीचे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे पूना क्लब ११.२ षटकात ४बाद ५१ असा अडचणीत सापडला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ऋषी नाळेने संयमपूर्ण फलंदाजी करत 51चेंडूत 5चौकार व 3 षटकार खेचून 50 धावा केल्या. त्याला अर्जुन वाघने 41चेंडूत 3चौकार व 3 षटकारासह नाबाद 44 धावा काढून साथ दिली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 39 चेंडूत 31 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. त्यानंतर अर्जुन याने श्रीकांत मुंढे(8)च्या साथीत सहाव्या विकेटसाठी 34 चेंडूत 40 धावांची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
डेक्कन जिमखाना: 30.2 षटकात सर्वबाद 134धावा(देवराज बेद्रे 40(60,5×4), कपिल गायकवाड 31(38,4×4,1×6), सर्वेश सुर्वे 20, सौरभ पवार 4-14, धनराज परदेशी 2-21, निमीर जोशी 2-30) पराभुत वि.पूना क्लब: 25.3 षटकात 3बाद 135धावा(ऋषी नाळे 50(51,5×4,3×6), अर्जुन वाघ नाबाद 44(41,3×4,3×6), आकिब शेख 15, रुषभ राठोड नाबाद 10, आदिनाथ गायकवाड 2-29, सिद्धेश भोसले, 2-4 कपिल गायकवाड 1-20); सामनावीर-सौरभ पवार; पूना क्लब संघ 4 गडी राखून विजयी;
More Stories
दुसऱ्या कमिशनर्स करंडक क्रिकेट स्पर्धेचे 10 मेपासून आयोजन
पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत वेकफील्ड डिलाइट्स, स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स, एचके पावरहाऊस संघांचे विजय
पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स संघाचा दुसरा विजय