December 13, 2024

पुणे जिल्हा 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत शहरातील 70 खेळाडू सहभागी

पुणे, 4 एप्रिल, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित  पुणे जिल्हा 17 वर्षाखालील मुले व मुलींच्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून  70 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा गणेश सभागृह कर्वे रोड येथे 6 ते 7 एप्रिल 2023 रोजी होणार आहे.

प्रकाश कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.स्पर्धेत एकूण 70 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये मुलांच्या गटात 52 प्रवेशिका तर, मुलींच्या गटात 18 प्रवेशिका आल्या आहेत.

स्पर्धेत सहभागी मानांकित खेळाडूंमध्ये मुलांच्या गटात विहान दावडा(1512), प्रथमेश शेरला(1463), अर्णव कदम(1448) यांचा आणि मुलींच्या गटात आदिती कायल(1577),निहिरा कौल(1259),  राजेश्वरी देशमुख(1235) यांचा समावेश आहे. तसेच, या स्पर्धेतील मुलांच्यय गटातील सात खेळाडूंची आणि मुलींच्या गटातील पाच खेळाडूंची निवड आगामी बुलढाणा येथे होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार असून हे खेळाडू या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. हि स्पर्धा 14 ते 16 एप्रिल 2023 या कालावधीत रंगणार आहे.

स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे उपाध्यक्ष  व ट्रुस्पेसचे संचालक आश्विन त्रिमल यांच्या हस्ते  6एप्रिल 2023 ररोजी सकाळी 9.30 वाजता  गणेश सभागृह येथे करण्यात येणार असून त्यानंतर स्पर्धेची पहिली फेरी सुरू होणार असल्याचे कुंटे यांनी सांगितले.