पुणे, ६ नोव्हेंबर २०२६: लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर आणि नागरिकांच्या मागणीनुसार पुणे मेट्रो प्रशासनाने रविवार, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी मेट्रोच्या सेवा वेळेत दोन तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, रविवारी पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी या दिवशी मेट्रो सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असणार होती. सणासुदीच्या काळात शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ११ या वेळेत मेट्रो सेवा उपलब्ध असणार नाही.
पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सोमवार, ९ नोव्हेंबरपासून मेट्रो सेवा पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होईल. त्यानुसार मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पुणे मेट्रो प्रशासनाने केले आहे.

More Stories
पुणे: मोहम्मदवाडीतील खासगी जागेवर कचरा टाकून जाळला जात असल्याचा आरोप; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
‘विद्यापीठ नव्हे, विद्यार्थ्यांचे दुसरे घर! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ६०० विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव’
हुशार पिढी घडवतोय; पण संवेदनशील माणसं घडवत आहोत का?