पुणे, २० ऑक्टोबर, २०२३ : पुण्यातील पहिले लक्झरी लाइफस्टाइल डेस्टिनेशन ठरणाऱ्या ‘कोपा’ या मॉलचे दरवाजे उद्या, शनिवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी ग्राहकांसाठी उघडणार आहेत. संपूर्ण भारतात गुंतवणूक करणाऱ्या व मोठ्या शॉपिंग सेंटर्सचे विकसन करणाऱ्या ‘लेक शोअर’ या कंपनीने कोपाची उभारणी पुण्यात केली आहे. पुण्यातील इतर कोणत्याही मॉल्सपेक्षा वेगळ्या प्रकारचा खरेदीचा अनुभव कोपामध्ये मिळणार आहे.
कोरेगाव पार्कसारख्या शांत, आलिशान भागात सुरू होणाऱे कोपा हे एक अनोखे ‘बुटीक सोशल डेस्टिनेशन’ आहे. पुण्याच्या या सर्वात संपन्न अशा निवासी भागात सामावलेल्या तीन मजली मॉलमध्ये दुकाने, रेस्टॉरंट्स आणि अत्याधुनिक चित्रपटगृहे आहेत. येथील अ दर्जाची व्यावसायिक स्वरुपाची सुमारे २० ते ३० लाख चौरस फूट इतकी जागा काही नामवंत, मोठ्या व्यावसायिक डेव्हलपर्सकडून विकसीत केली जात आहे. इथल्या रेस्टॉरंट्समधून खाद्य-पेयांची उच्च संस्कृती जोपासली जाईल आणि त्यांचा लाभ विद्यार्थी, परिसरातील व्यावसायिक आणि कुटुंबांना घेता येईल.
सुमारे सव्वातील लाख चौरस फुटांमध्ये पसरलेल्या आलिशान कोपा मॉलमध्ये शंभराहून अधिक ब्रँड्सची दुकाने आहेत. सर्व प्रकारच्या देशी-विदेशी ब्रँड्सची वैशिष्ट्ये जपण्यासाठी मॉलमधील दुकानांच्या स्थानांचा काळजीपूर्वक विचार करण्यात आला आहे. मायकेल कॉर्स, वेस्ट एल्म, व्हाईट क्रो, व्हिक्टोरिया सीक्रेट, नप्पा डोरी, ह्यूगो बॉस, ब्रूक्स ब्रदर्स आणि तुमी हे काही मार्की लक्झरी ब्रँड पुण्यातील चोखंदळ ग्राहकांसाठी प्रथमच कोपामध्ये उपलब्ध होत आहेत. निकोबार, अरमानी एक्सचेंज आणि जयपूर वॉच कंपनी हे पुण्यात पदार्पण करणारे इथले इतर काही मार्की ब्रँड आहेत.
‘लेक शोअर’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन पुरी याप्रसंगी म्हणाले, “पुण्यातील नागरिकांना खरेदीचा आणि खाद्यसंस्कृतीचा एक वेगळा अनुभव देण्याच्या उद्देशाने आणि काहीतरी वेगळे घडविण्याच्या हेतूने आम्ही २०१९ मध्ये ही मालमत्ता खरेदी केली होती. संपूर्ण समाजाला एक संपन्न अनुभव देऊ शकेल, असे शॉपिंगचे व मनोरंजनाचे केंद्र निर्माण करण्याचे आमचे स्वप्न आता साकार झाले, असे वाटते.”
काही ट्रेंडी रेस्टॉरंट्स आणि नाईट-लाइफ यांसाठी कोरेगाव पार्क प्रसिद्ध आहे. बार, खाद्यपदार्थ व कॅफे यांचा आस्वाद घेण्यासाठी सगळ्या पुणे शहरातून नागरीक कोरेगाव पार्कात येत असतात. या भागात आणखी एखादी खाऊगल्ली उभी राहू शकेल, या जाणिवेतून ‘कोपा’मध्ये रेस्टॉरंट्स व कॅफे उभारण्यात आले आहेत. आनंददायी, उत्साही वातावरणात चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्याचा इथला अनुभव पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरेल, हे निश्चित. खास डिझाइन केलेल्या ‘डायनिंग डिस्ट्रिक्ट’चा एक भाग म्हणून या मॉलमध्ये तीसहून अधिक फूड अॅंड बीव्हरेजेस ब्रँड्स खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. तसेच ‘व्हिलेज’ हा एक विशेष आउटडोअर बार व ‘रेस्टॉरंट डिस्ट्रिक्ट’ही ‘कोपा’मध्ये असणार आहे. यामध्ये दोन रूफ टॉप लाउंज आणि सात रेस्टॉरंट यांचा समावेश आहे.

More Stories
Pune: विश्रांतवाडी–आळंदी रस्त्यावरील अपघातांच्या विरोधात ‘डिव्हायडरची आरती’; अर्धवट बीआरटी मार्ग हटवण्यासाठी आंदोलन
पुणे जिल्ह्यात 13 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
‘पुणे पुस्तक महोत्सव २०२५’चे १३ ते २१ डिसेंबर दरम्यान आयोजन