May 18, 2024

पुनीत बालन ग्रुपच्या पाठीब्यामुळेच सुवर्णपदकाला गवसणी – ऋतुजा भोसले हिचे उद्गार

पुणे, २०/१०/२०२३: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर देशाचे राष्ट्रगीत व तिरंगा परदेशात फडकविण्यात आला. तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सोनेरी क्षण आहे. यासाठी माझ्या कुटुंबियाबरोबरच बरोबर पुनित बालन सरांनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. त्यामुळे हे सुर्वपदक मिळवणे शक्य झाल्याचे उद्गगार सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले हिने काढले.

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुनीत बालन ग्रुपच्या स्टार खेळाडू ऋतुजा भोसले यांनी मिक्स डबल मध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिले त्याबद्दल त्यांचा पुनीत बालन ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत बालन आणि माणिकचंद ऑक्सीरिचच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, ऋतुजा हिचे पती स्वप्नील गुगळे व आई नीता भोसले उपस्थित होते. यावेळी गणपती बाप्पाचा मोदक देऊन बालन दांपत्याने ऋतुजा हिचा सत्कार केला.

त्यावेळी बोलताना ऋतुजा म्हणाली आगामी काळात ऑस्ट्रेलियन ओपन बरोबर ऑलिम्पिक स्पर्धा ही येत आहेत. त्याची तयारी आत्तापासूनच करणार आहे. प्रशिक्षकांकडूनही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळत असून आगामी ऑलिम्पिकचे ध्येय बाळगले असल्याचे भोसले हिने सांगितले.

पुनित बालन यावेळी बोलताना म्हणाले की, ऋतुजा ने मेडल जिंकून केवळ बालनग्रुप व महाराष्ट्राचेच नाव नाही तर देशाचे नाव उंचावले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ऋतुजा सारख्या गुणी खेळाडू ना मदत करण्यास बालन ग्रुप नेहमी पुढे राहिलं. तिला ऑलिम्पिक तयारी साठी आम्ही सर्व प्रकारे आथिर्क मदत करण्यास तयार आहोत. तिने फक्त ऑलिम्पिक साठी मेडल जिंकावे हीच आमची इच्छा आहे.