पुणे, १८/०९/२०२४: महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी(आझम कॅम्पस) आणि संलग्न संस्थाच्या वतीने शुक्रवार,दि.२० सप्टेंबर रोजी हजरत मुहम्मद पैगंबर जयंती(ईद-ए-मिलाद) निमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ८.३० वाजता संस्थेचे अध्यक्ष तसेच ‘डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी’ चे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीचे उदघाटन होऊन मिरवणुकीस प्रारंभ होईल.
हजरत मुहम्मद पैगंबरांच्या संदेश,घोषवाक्याचे फलक मिरवणुकीचे आकर्षण असेल.संस्थेचे सचिव प्रा.इरफान जे.शेख,संस्थेचे संलग्न पदाधिकारी,प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.मिरवणूक आझम कॅम्पस येथून निघून,डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट,ट्राय लक हॉटेल,कोहिनुर हॉटेल,बाटा चौक,सरबतवाला चौक,क्वार्टर गेट,पद्मजी पोलीस चौकी,निशात थिएटर,भगवानदास चाळ,चुडामण तालीम,पूना कॉलेज मार्गे आझम कॅम्पस येथे मिरवणुकीची सांगता होईल.अभिवादन मिरवणूक उपक्रमाचे हे २० वे वर्ष आहे.
दरवर्षी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात. हजारो विद्यार्थी त्यात सहभागी होतात.त्यातून महामानवांचे सामाजिक ,शैक्षणिक संदेशांचा प्रसार केला जातो.

More Stories
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : जागतिक सायकलपटूंसाठी पुण्याचा उत्साहवर्धक अनुभव
बजाज पुणे ग्रँड टूर २०२६: ढोल-ताशे, शिवगर्जना आणि सेल्फी, प्रोलॉग रेसमध्ये पुणेकरांचा रंगारंग स्वागत
यंदाचे ‘एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन’ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित