April 24, 2024

पूना क्लब रॅकेट लीग 2023 स्पर्धेत एकूण 135 खेळाडू सहभागी

पुणे, 31 मे 2023- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत 6 संघात 135 खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर दि. 2 जूनपासून सुरू होणार आहे.

पत्रकारपरिषदेत अधिक माहिती देताना पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष सुनील हांडा आणि उपाध्यक्ष गौरव गढोके यांनी सांगितले की,  क्लबच्या सभासदांकरिता क्रिकेट, स्नूकर, स्विमिंग, फुटबॉल आणि इतर सर्व रॅकेट क्रीडा प्रकारांमध्ये अशा पाच वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात लीग स्पर्धा आयोजित करणारा पूना क्लब हा शहरांतील एकमेव क्लब आहे. तसेच या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून सदस्यांना  मनोरंजनबरोबरच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यास महत्वपूर्ण ठरेल.  पूना क्लब लिमिटेडचे सचिव कर्नल सरकार आणि कारा इंटलेक्टचे रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विविध क्रिडाप्रकारांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी पुना क्लब नेहमीच आघाडीवर असतो. या स्पर्धेला  ग्रॅविटस फाउंडेशन यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले आहे. लिलावात पवित पठेजा(4200गुण,लायन्स), तितिक्षा पवार(3700गुण, पँथर्स), हे सर्वात महागडे खेळाडू ठरले आहेत.  कारा इंटलेक्ट यांच्या संकल्पेनेतून व व्यवस्थापनेतून ही स्पर्धा होत आहे.

पूना क्लब लिमिटेडच्या स्पर्धा समितीचे अध्यक्ष अमेय कुलकर्णी यांनी सांगितले की, या लढतीमध्ये दोन्ही संघात मिळून बॅडमिंटन व टेबल टेनिस, टेनिस, स्क्वाश प्रकारात असे एकूण 16 सामने होणार आहेत. तसेच, प्रत्येक क्रीडा प्रकारात खेळाडूला त्याच्या खेळातील क्षमतेनुसार स्टार देण्यात येणार आहे. तसेच, स्पर्धेत या चारही क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार असल्याचे त्यांनी नमुद केले.यामध्ये प्रत्येक क्रीडा प्रकारातील पहिला सामना 11 गुणांचा, तर दुसरा व तिसरा सामना 15 गुणांचा आणि चौथा सामना 31 गुणांचा असणार आहे. या टायमधील सर्वाधिक गुणांची कमाई करणारा संघ सामन्यातील विजेता ठरणार आहे.  सामन्यात बरोबरी झाल्यास दोन्ही संघांमध्ये गोल्डन पॉईंट सामना खेळविण्यात येणार आहे.  बॅडमिंटन, टेनिस व टेबल टेनिस प्रकारात दुहेरी सामने तर, स्क्वाश प्रकारात एकेरी सामने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी 135खेळाडूंची निवड लिलाव पध्दतीने करण्यात आली असून हे खेळाडू सहा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेतील सहभागी संघ व संघमालक यामध्ये मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स(मनप्रीत उप्पल व गौरव गढोके), ओबेरॉय अँड निल किंग्ज(वीरेंदर सिंग ओबेरॉय व इंद्रनील मुजगुले), लायन्स(अमरजीत छाब्रा व पवित पथेजा), कॉन्व्हेकस शार्क्स(कृष्णा व देव गुहवालेवाला), परमार ऑल स्टार्स(हिरेन परमार), वेकफिल्ड डिलाईट(आश्विनी मल्होत्रा)हे सहा संघ सहभागी झुंजणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अमेय कुलकर्णी(स्पर्धा समिती अध्यक्ष), आदित्य कानिटकर आणि परमार यांचा समावेश आहे.