पुणे, 11 जानेवारी, 2025: पुण्याच्या स्पोर्ट्स मॅनियाने सर्वोत्तम फॉर्म कायम राखताना चारूतर विद्या मंडळ (सीव्हीएम) एफसीवर1-0 असा विजय मिळवून एआयएफएफ एलिट युथ लीग फुटबॉल स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. या विजयासह त्यांनी ग्रुप एचमध्ये संयुक्तरित्या अव्वल स्थानी झेप घेतली.
गुजरातमधील आणंद येथील सीव्हीएम एफसी मैदानावर शुक्रवारी या मोसमातील त्यांचा दुसरा ‘अवे’ सामना खेळत असलेल्या स्पोर्ट्स मॅनियाकडून शौनक धापटे, शेर्विन सेल्वाराज आणि पृथ्वीराज पाटीलने चांगल्या चाली रचताना गोल करण्याचे प्रयत्न केले.
मात्र, सामन्यातील एकमेव आणि निर्णायक गोल डावखुरा मिडफिल्डर आल्हाद हाटेने अतिरिक्त वेळेत (90+4) केला. शौनक धापटेने उजव्या पोलवरून घेतलेल्या कॉर्नर-किकवर गोल झाला. रोमित जांभळेने हेडरद्वारे मोठी संधी उपलब्ध करून दिली. त्यावर आल्हादने चेंडूला अचूक गोलजाळ्यात ढकलले.
स्पोर्ट्स मॅनियाचा या हंगामातील हा सलग तिसरा विजय आहे. त्यांनी पहिल्या फेरीत ‘होम’ सामन्यात महाराष्ट्र ओरांजे एफसीचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत (अवे) राजस्थान एफसीला 1-0 असे हरवले.
स्पोर्ट्स मॅनिया सध्या तीन सामन्यांनंतर प्रत्येकी 9 गुणांनिशी झिंक एफसीसह अव्वल स्थानी आहे. एआरए एफसी दुसऱ्या स्थानी आहे.
स्पोर्ट्स मॅनियाचा पुढचा सामना एआरए एफसीविरुद्ध 13 जानेवारी रोजी अहमदाबादच्या नरोडा येथे खेळेल.
More Stories
दीक्षित लाईफस्टाईल हाफ मॅरेथॉन उत्साहात संपन्न
पुणे: सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या क्रीडा महोत्सवात रंगली स्केटींग व टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा
11व्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर क्रिकेट लीग 2025 स्पर्धेस 12 जानेवारीपासून प्रारंभ