May 14, 2025

11व्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर क्रिकेट लीग 2025 स्पर्धेत सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघाची विजयाची हॅट्रिक

पुणे, 14 जानेवारी 2025 – पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने अकराव्या पीवायसी- पुसाळकर प्रीमियर लीग क्रिकेट 2025 स्पर्धेत साखळी फेरीत ईशांत रेगे(नाबाद 68), अभिषेक ताम्हाणे(नाबाद 52)यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघाने रावेतकर बुल्स संघाचा धावांनी पराभव करून विजयाची हॅट्रिक साजरी केली.

पीवायसी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघाने 6 षटकात 1बाद 125 धावांचा डोंगर उभा केला. यात सलामवीर ईशांत रेगेने 18चेंडूत 2चौकार व 9 षटकारासह नाबाद 68 धावांची तुफानी खेळी केली. त्याला अभिषेक ताम्हाणेने 18चेंडूत 4चौकार व 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 52 धावांची खेळी करून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी चेंडूत धावांची भागीदारी करून संघाला स्पर्धेतील आता पर्यंतची सर्वोच्च धावसंख्या उभारून दिली. याच्या उत्तरात रावेतकर बुल्सला निर्धारित षटकात 6 षटकात 3बाद 66धावाच करता आल्या. यात कृष्णा मेहता नाबाद 27, योगेश भोंगळे 13, परिपोष शेट्टी नाबाद 11, पराग चोपडा 11 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली.

दुसऱ्या लढतीत श्रीनिवास चाफळकर(नाबाद 64 व 1-7) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने रांजेकर देवगावकर लायन्स संघावर 38 धावांनी विजय मिळवला.

काल रात्री उशिरा झालेल्या लढतीत इशांत रेगे नाबाद 49 धावांच्या खेळीच्या जोरावर सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघाने पायरेट्स संघाचा 6 गडी राखून पराभव करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अंकुश जाधव 39 धावांच्या जोरावर ए अँड ए शार्क्स संघाने ओव्हन फ्रेश टस्कर्स संघावर 6 गडी राखून विजय राखत आपली विजयी मालिका कायम राखली. रौनक ढोले पाटील(नाबाद 73 धावा व 2-4) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर गरगंटू डिस्ट्रॉयर्स संघाने रावेतकर बुल्स संघाचा 23 धावांनी पराभव करून दुसरा विजय मिळवला.

निकाल: साखळी फेरी:
ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6 षटकात बिनबाद 94धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 64(25,3×4,6×6), हर्षल गंद्रे नाबाद 24(12,1×4,2×6)) वि.वि.रांजेकर देवगावकर लायन्स: 6 षटकात 5बाद 56धावा(अमित परांजपे 14, मोनिश गोखले नाबाद 11, श्रीनिवास चाफळकर 1-7, हर्षल गंद्रे 1-9); सामनावीर – श्रीनिवास चाफळकर; ओव्हन फ्रेश टस्कर्स संघ 38 धावांनी विजयी;

सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स: 6 षटकात 1बाद 125धावा(ईशांत रेगे नाबाद 68(18,2×4,9×6), अभिषेक ताम्हाणे नाबाद 52(18,4×4,5×6), पिनाकिन मराठे 1-11) वि.वि.रावेतकर बुल्स: 6 षटकात 3बाद 66धावा(कृष्णा मेहता नाबाद 27, योगेश भोंगळे 13, परिपोष शेट्टी नाबाद 11, पराग चोपडा 11, ईशांत रेगे 1-6, नितीन सरदेसाई 1-7); सामनावीर – ईशांत रेगे; सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघ 59 धावांनी विजयी;

पायरेट्स: 6 षटकात 2बाद 75धावा(तन्मय चोभे नाबाद 61(23,3×4,7×6), जिनेश जैन 1-9) पराभूत वि.सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स: 4.5 षटकात 2बाद 76धावा(इशांत रेगे नाबाद 49(16,2×4,6×6), शंतनू कानिटकर नाबाद 14, कुणाल शहा 1-17); सामनावीर-इशांत रेगे; सुप्रीम बेल्फिन्स टायगर्स संघ 6 गडी राखून विजयी;

ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6 षटकात 2बाद 91धावा(श्रीनिवास चाफळकर नाबाद 65(22,4×4,6×6), हर्षल गंद्रे 14, अनुज मेहता 1-9) पराभुत वि.ए अँड ए शार्क्स: 5.1 षटकात 2बाद 92धावा(अंकुश जाधव 39(1) 3×4,4×6), अनुज लोहाडे नाबाद 24, आशिष राठी नाबाद 20, अर्णव कुंटे 2-12); सामनावीर – अंकुश जाधव; ए अँड ए शार्क्स संघ 6 गडी राखून विजयी;

गरगंटू डिस्ट्रॉयर्स: 6 षटकात 1 बाद 120धावा(रौनक ढोले पाटील नाबाद 73(22,2×4,9×6), रणजित पांडे नाबाद 37(17,2×4,3×6)) वि.वि.रावेतकर बुल्स: 6 षटकात 3 बाद 97धावा(प्रसाद जाधव 45(16) 3×4,5×6), परितोष शेट्टी नाबाद 19, कृष्णा मेहता 13, रौनक ढोले पाटील 2-4); सामनावीर-रौनक ढोले पाटील; गरगंटू डिस्ट्रॉयर्स संघ 23 धावांनी विजयी;