October 5, 2024

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर माफीचा लाभ घेण्याचे आवाहन

06 सप्टेंबर 2024: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकर माफीची सवलत देण्यात आली असून गणेशभक्तांनी १९ सप्टेंबरपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परत येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना तसेच महामंडळाच्या बसेसना पथकरातून सुट देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तरी भाविकांनी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, अनुज्ञप्ती, कर प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र व वाहतूक परवाना आदी कागदपत्रे सादर प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९ डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे येथे कार्यालयीन वेळेत जमा करावीत. त्यानंतर गणेशभक्तांना पथकरातून सुट देण्याबाबत पासेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे