March 16, 2025

‘चाणक्य मंडल’च्या यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकण्याची संधी 

पुणे, 23 जून 2024: यूपीएससी परीक्षेत यशस्वी झालेल्या ‘चाणक्य मंडल परिवार’च्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि त्यांचे मनोगत ऐकण्याचा कार्यक्रम पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे सोमवार, २४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच प्रयत्नात, वयाच्या केवळ २२ व्या वर्षी निवडला गेलेला चाणक्य मंडलचा विद्यार्थी आणि आता प्राध्यापक समर्थ शिंदेसोबत इतर अनेक यशस्वीतांना ऐकण्याची संधी या कार्यक्रमामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यावर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एकूण १०१६ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यांपैकी तब्बल ३०६ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये विविध टप्प्यांवर मार्गदर्शन घेतले आहे. संपूर्ण भारतात पहिल्या १० मध्ये ३, पहिल्या २० मध्ये ६, पहिल्या ५० मध्ये १७ तर पहिल्या १०० पैकी ३२ विद्यार्थ्यांनी चाणक्य मंडल परिवारमध्ये परीक्षेसंबंधी मार्गदर्शन घेतले.

अभिनंदन कार्यक्रमात श्रीकृष्ण सुशीर, शुभम थिटे, आदिती चौगुले, सागर भामरे, युगल कापसे, गौरी देवरे, प्रितेश बाविस्कर, सिद्धार्थ तगड, प्रांजली नवले, आदित्य बामणे यांच्यासहित अनेक यशस्वित आपल्या स्पर्धापरीक्षा तयारीचा अनुभव मांडतील. या कार्यक्रमासाठी नावनोंदणी आवश्यक असून अधिक माहितीसाठी ०८०६९०१५४५४ वर संपर्क करता येईल.