September 14, 2024

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन

पुणे, 23 फेब्रुवारी 2023: सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक फेब्रुवारी व मार्च २०२३ चे धान्य घेताना समाविष्ट करुन घ्यावेत.

लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास त्यांनी धान्य घेतल्यानंतर प्राप्त होणारे संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपले धान्य घेतावेळी दुकानदारांकडे ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करता येतील. तसेच यापूर्वी समाविष्ट भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा असल्यास सुधारित भ्रमणध्वनी क्रमांक तालुका पुरवठा कार्यालयात देऊन प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार येणार आहे.

तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालय, परिमंडळ कार्यालय तसेच रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.