May 16, 2024

महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन प्रभू, शौर्य बागडिया यांचे विजय

पुणे, 27 जुलै, 2023: पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य 11 वर्षाखालील खुल्या व मुलींच्या गटातील फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या फेरीत मुंबई उपनगरच्या  1196 रेटिंग असलेल्या अर्जुन प्रभूने पुण्याच्या अद्विक अग्रवालचा सनसनाटी पराभव करून 3 गुणांची कमाई केली. तर, कोल्हापूरच्या शौर्य बागडियाने पुण्याच्या सिद्धांत साळुंकेचा पराभव करून 3गुण प्राप्त केले.  
 
कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृह येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटात अव्वल मानांकित नागपूरच्या शौनक बडोले ने मुंबई उपनगरच्या अनय घुलेवर विजय मिळवत 3 गुण मिळवले.  पुण्याच्या अविरत चौहानने आपला शहर सहकारी आरव धायगुडेला पराभूत केले. 
 
मुलींच्या गटात नागपूरच्या वेदिका पाल, अन्वी हिरडेमुंबई उपनगरच्या मायशा परवेझ, औरंगाबादच्या भूमिका वाघले, यवतमाळच्या स्वधा दातीर मुंबई शहरच्या त्वेशा जैनया खेळाडूंनी 3 गुणांसह आघाडी मिळवली. याआधी स्पर्धेचे उदघाटन ध्यानचंद पुरस्कार विजेते ग्रॅण्डमास्टर अभिजीत कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले आणि चेस असोसिएशन नागपूरचे सचिव भूषण श्रीवास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीसीसीचे उपाध्यक्ष प्रकाश कुंटे, नितीन शेणवी, चीफ आरबीटर दीप्ती शिदोरे, राजेंद्र शिदोरे, स्पर्धा संचालक विनिता श्रोत्री आदी मान्यवर उपस्थित होते,  
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: तिसरी फेरी: खुला गट:
शौनक बडोले (नागपूर)(3 गुण)वि.वि.अनय घुले(मुंबई उपनगर)(2गुण);
अविरत चौहान(पुणे)(3गुण)वि.वि.आरव धायगुडे(पुणे)(2गुण)
अद्वय बेंडे (पुणे)(2गुण)पराभुत वि.अभय भोसले(कोल्हापूर)(3गुण);
अद्विक अग्रवाल (पुणे)(2गुण)पराभुत वि.अर्जुन प्रभू(मुंबई उपनगर)(3गुण);
शौर्य बागडिया(कोल्हापूर)(3गुण)वि.वि.सिद्धांत साळुंके(पुणे)(2गुण);
आरुष डोळस(पुणे)(३ गुण)वि.वि.क्षितिज प्रसाद(पुणे)(२गुण);
आरव पाटील (कोल्हापूर)(2गुण)पराभुत वि.सहजवीर सिंग मरस(नागपूर)(3गुण);
नीमय भानुशाली(मुंबई उपनगर)(3गुण)वि.वि.श्रीयांश आघारकर(मुंबई उपनगर)(2गुण);
प्रतीक तांबी (अमरावती)(3गुण)वि.वि.कवीश कागवडे(रायगड)(2गुण);
हीत बलदवा (कोल्हापूर)(2 गुण) पराभुत वि.शाश्वत गुप्ता (पुणे) (3 गुण);
 
मुली: 
वेदिका पाल(नागपूर) (3गुण) वि.वि.दिव्यांशी खंडेलवाल(नागपूर) (2 गुण);
सान्वी गोरे (सोलापूर)(2गुण)पराभुत वि.मायशा परवेझ (मुंबई उपनगर)(3 गुण);
भूमिका वाघले (औरंगाबाद)(3गुण)वि.वि.हिरणमयी कुलकर्णी (मुंबई उपनगर) (2 गुण);
ओवी पावडे (पुणे)(2गुण)पराभुत वि.अन्वी हिरडे(नागपूर)(3गुण);
स्वधा दातीर(यवतमाळ)(3गुण)वि.वि.देविका पिंगे(मुंबई शहर)(2गुण);
व्याघा बैजू (रायगड) (2गुण)पराभुत वि.त्वेशा जैन (मुंबई शहर) (3गुण);
चतुर्थी परदेशी (पुणे)(2.5गुण)वि.वि.समायरा चौधरी(पुणे)(2गुण);