October 3, 2024

चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग 2024 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स, स्टॅश – प्रो ऑल स्टार्स संघांचे सनसनाटी विजय

पुणे, 8 जुलै 2024- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित चौथ्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत ओबेरॉय अँड निल किंग्ज, एएसआर स्ट्रायकर्स, स्टॅश – प्रो ऑल स्टार्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच कायम राखली.

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस व बॅडमिंटन, स्क्वॅश कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एएसआर स्ट्रायकर्स संघाने एचके पॉवर हाऊस संघाचा 280-249 असा पराभव केला. बॅडमिंटनमध्ये रोनक मनुजा, रोनक शहा, आर्यन ढेरे, भगवान पवार, अद्विका परमार, अरमान बलदोटा यांच्या विजयी खेळीच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्स संघाने एचके पॉवर हाऊसचा 68-56 असा तर, स्क्वॅशमध्ये रणजीत बाला, अरमान बलदोटा, अमन खानयाऱी यांच्या खेळीच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्सने एचके पॉवर हाऊसचा 63-31 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये एएसआर स्ट्रायकर्सला एचके पॉवर हाऊसने 58-65 असे पराभूत केले. तर, टेनिसमध्ये एएसआर स्ट्रायकर्सला एचके पॉवर हाऊसने 50-56 असे पराभूत केले. अखेरच्या पिकल बॉलच्या लढतीत एएसआर स्ट्रायकर्स व एचके पॉवर हाऊस यांच्यातील लढत बरोबरीत सुटली.

दुसऱ्या सामन्यात ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने कॉन्व्हेकस शार्क्सचा 284-229 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. बॅडमिंटनमध्ये योहान खिंवसरा, आनंद शहा, प्रीती सप्रे, अर्जुन मोटाडू, विवेक पंजाबी, ब्रिन्दा थॉमस यांच्या खेळीच्या जोरावर किंग्जने शार्क्सचा 70-43 असा तर, स्क्वॅशमध्ये क्रिश डेमला, आनंद शहा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर किंग्जने शार्क्सचा 56-32 असा पराभव करून आघाडी घेतली. टेबल टेनिसमध्ये मात्र ओबेरॉय अँड निल किंग्जला कॉन्व्हेकस शार्क्सने 54-58 असे तर, टेनिसमध्ये ओबेरॉय अँड निल किंग्जला कॉन्व्हेकस शार्क्सने 57-59 असे पराभूत करून आघाडी कमी केली. पण पिकल बॉलमध्ये आर्यन कीर्तने, तुषार आसवानी, रियान मुजगुले, क्रिश डेमला यांच्या खेळीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्जने कॉन्व्हेकस शार्क्सचा 47-37 असा पराभव करून विजय मिळवला. अन्य लढतीत स्टॅश – प्रो ऑल स्टार्स संघाने मानव ऍव्हेंजर्सचा 281-270 असा पराभव केला. स्टॅश – प्रो ऑल स्टार्सकडून यश शहा, इंद्रसेन घोरपडे, भार्गव पाठक, प्रतीश थडानी, प्रांजली नाडगोंडे, ऋषिकेश अधिकारी, कौस्तुभ नाडगोंडे, पूनम राठी यांनी विजयी कामगिरी केली.

निकाल: साखळी फेरी:
एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.एचके पॉवर हाऊस 280-249
बॅडमिंटन: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.एचके पॉवर हाऊस 68-56;
स्क्वॅश: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.एचके पॉवर हाऊस 63-31;
टेबल टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स पराभुत वि.एचके पॉवर हाऊस 58-65;
टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स पराभुत वि.एचके पॉवर हाऊस 50-56;
पिकल बॉल: एएसआर स्ट्रायकर्स बरोबरी वि.एचके पॉवर हाऊस;

ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 284-229
बॅडमिंटन: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 70-43;
स्क्वॅश: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 56-32;
टेबल टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभुत वि.कॉन्व्हेकस शार्क्स 54-58;
टेनिस: ओबेरॉय अँड निल किंग्ज पराभुत वि.कॉन्व्हेकस शार्क्स 57-59;
पिकल बॉल: ओबेरॉय अँड निल किंग्ज वि.वि.कॉन्व्हेकस शार्क्स 47-37;

स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि.वि.मानव ऍव्हेंजर्स 281-270
बॅडमिंटन: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स पराभूत वि.मानव ऍव्हेंजर्स 63-64;
स्क्वॅश: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स पराभूत वि.मानव ऍव्हेंजर्स 56-57;
टेबल टेनिस: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स पराभूत वि.मानव ऍव्हेंजर्स 63-71;
टेनिस: स्टॅश – प्रो ऑल स्टार्स पराभूत वि.मानव ऍव्हेंजर्स 52-56;
पिकल बॉल:स्टॅश – प्रो ऑल स्टार्स वि. वि.मानव ऍव्हेंजर्स 47-22