October 3, 2024

योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सूर्य प्रताप सिंग, संजय एस. नायर, तरनजीत कौर,नेसा करिअप्पा ए. यांचे सनसनाटी विजय

पुणे, 9 जुलै 2024: पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना(पीडीएमबीए) यांच्या वतीने योनेक्स सनराईज व्हीव्ही नातू मेमोरियल अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत पात्रता फेरीत सूर्य प्रताप सिंग, संजय एस. नायर यांनी तर, महिला गटात तरनजीत कौर, रीवा इव्हेंजेलिन एम., नेसा करिअप्पा ए. यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

पी.ई. सोसायटीज पीडीएमबीए स्पोर्टस कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, सीओईपी बॅडमिंटन कोर्ट, पीवायसी हिंदू जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत महिला गटात दुसऱ्या पात्रता फेरीत उत्तरप्रदेशच्या तरनजीत कौर हिने चौथ्या मानांकित महाराष्ट्राच्या मधुमिता नारायणचा 16-14 15-13 असा तर, चुरशीच्या लढतीत तामिळनाडूच्या रीवा इव्हेंजेलिन एम.ने तेलंगणाच्या दहाव्या मानांकित दीपशिका नेरेडिमेल्लीचा 10-15 15-13 15-8 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या क्रिशा सोनीने तेलंगणाच्या द्योत्ना कोमरावेल्ली चे आव्हान 11-15 15-13 18-16 असे संपुष्टात आणले. तामिळनाडूच्या निवेथा एम. हिने कर्नाटकच्या आयुषी भटला 15-10 12-15 15-9 असे पराभूत केले. राजस्थानच्या तनिषा सिंगने महाराष्ट्राच्या कृपी सजवानवर 15-12, 15-8 असा विजय मिळवला. कर्नाटकच्या नेसा करिअप्पा ए. हिने आसामच्या पंचविसाव्या मानांकित मयुरी बर्मनला 15-10 15-10 असे नमविले.

पुरुष गटात तिसऱ्या पात्रता फेरीत उत्तरप्रदेशच्या सूर्य प्रताप सिंग याने अरुणाचलप्रदेशच्या सातव्या मानांकित तलार लावर 15-12 15-12 असा विजय मिळवत आगेकूच केली. केरळच्या संजय एस. नायर याने उत्तरप्रदेशच्या तिसऱ्या मानांकित सिद्धार्थ मिश्राचा 15-7 11-15 18-16 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या सुवीर प्रधान याने कर्नाटकच्या आनंद बालकृष्णन के.व्ही.चा 15-1 15-11 असा तर, महाराष्ट्राच्या ओजस गेडामने गुजरातच्या साकेत ठक्करचा 15-7 15-5 असा पराभव करून पात्रता फेरीच्या चौथ्या चरणात प्रवेश केला.

निकाल: महिला: दुसरी पात्रता फेरी:
गार्गी सिंग(दिल्ली)वि.वि.गार्गी देगवेकर(महा)15-12, 15-8;
तरनजीत कौर(उत्तरप्रदेश)वि.वि.मधुमिता नारायण(महा)[4] 16-14 15-13;
झैनाब सईद(दिल्ली)वि.वि.सुनैना मलिक(हरियाणा) 15-11 16-14;
मेधावी नागर(हरियाणा)[6]वि.वि.अनन्या प्रवीण(कर्नाटक) 10-15 15-10 15-11;
रीवा इव्हेंजेलिन एम.(तामिळनाडू)वि.वि.दीपशिका नेरेडिमेल्ली(तेलंगणा)[10] 10-15 15-13 15-8;
स्तुती अग्रवाल (दिल्ली)वि.वि.साई वेंकट हेमा सेट्टी(आंध्रप्रदेश ) 15-11 17-15;
क्रिशा सोनी (महा)वि.वि.द्योत्ना कोमरावेल्ली(तेलंगणा) 11-15 15-13 18-16;
प्रवीणा एस.(तामिळनाडू)वि.वि.संजना आंबेकर(महा) 15-11 19-17;
तनिषा सिंग(राजस्थान) [31]वि.वि.कृपी सजवान(महा) 15-12, 15-8;
निवेथा एम.(तामिळनाडू) वि.वि.आयुषी भट(कर्नाटक) 15-10 12-15 15-9;
नेसा करिअप्पा ए.(कर्नाटक)वि.वि.मयुरी बर्मन(आसाम) [25] 15-10 15-10

पुरुष: तिसरी पात्रता फेरी:
रौनक चौहान (छत्तीसगढ)[1]वि.वि.अंकित मलिक(हरियाणा) 15-12 15-9;
सूर्य प्रताप सिंग(उत्तर प्रदेश)वि.वि.तलार ला(अरुणाचल प्रदेश)[7] 15-12 15-12;
आदित्य ओक (महा)वि.वि.इसाक नबाम(अरुणाचल प्रदेश) 15-12, 14-16, 15-12;
वसीम शेख (महा)वि.वि.मधुर धिंग्रा(दिल्ली) 15-10 16-14;
संजय एस. नायर (केरळ)वि.वि.सिद्धार्थ मिश्रा (उत्तरप्रदेश)[3] 15-7 11-15 18-16;
सिद्धार्थ दास (महा)वि.वि.यश दवे (मध्यप्रदेश) 15-10 15-3;
सुवीर प्रधान (महा)वि.वि.आनंद बालकृष्णन के.व्ही.(कर्नाटक) 15-1 15-11;
ओजस गेडाम (महा)वि.वि.साकेत ठक्कर (गुजरात) 15-7 15-5;
संजय ठाकूर (मध्यप्रदेश)वि.वि.निखिल के. (केरळ) 8-15 19-17 15-11;
अथर्व जोशी (महा)वि.वि.प्रणव कृष्णमूर्ती (कर्नाटक) 16-14 15-6;
गौरव परमार (चंदीगढ)वि.वि. मनमोहित संधू (पंजाब) 15-11 15-6;
आदित्य त्रिपाठी(महा)वि.वि.अभिनव कृष्णा व्हिडी(तेलंगणा) 15-13 15-13;
सरथ डी. (आंध्रप्रदेश)[6]वि.वि.शिवेन शर्मा(हरियाणा) 15-5 12-15 15-6;