June 22, 2025

पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत एएसआर स्ट्रायकर्स संघाचा दुसरा विजय

पुणे, 3 मे 2025- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत एएसआर स्ट्रायकर्स संघाने सलग दुसरा विजय मिळवला.

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश, पिकलबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत एएसआर स्ट्रायकर्स संघाने एचके पावरहाऊस संघाचा 274-249 असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. बॅडमिंटनमध्ये निरव बाफना,अश्विन शहा, सनत परमार, किरण संघवी, मोहित अरोरा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एचके पावरहाऊस संघाने एएसआर स्ट्रायकर्स संघाचा 73-58 असा पराभव करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. स्क्वॅशमध्ये आनंद शर्मा, कियारा गाडा यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्स संघाने एचके पावरहाऊस संघाचा 35-34 असा तर, टेनिसमध्ये एएसआर स्ट्रायकर्स संघाने एचके पावरहाऊसचा 62-50 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पिकल बॉलमध्ये रोनक मनुजा, अर्जुन राऊत, वीर मक्कर, विशाल सेठ, निक नंदा, आदित्य खटोड यांच्या खेळीच्या जोरावर एएसआर स्ट्रायकर्स संघाने एचके पावरहाऊस संघाचा 58-30 असा पराभव केला. अखेरच्या टेबल टेनिसप्रकारात एएसआर स्ट्रायकर्स संघाला एचके पावरहाऊस संघाकडून 61-62 असा निसटता पराभव पत्करावा लागला.

दुसऱ्या सामन्यात पिनॅकल युनायटेड संघाने ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाचा 272-262 असा पराभव करून पहिला विजय नोंदवला.

बॅडमिंटनमध्ये रोनक शहा, सारा नवरे, अर्जुन मोटाडू, वेदांत धाम, राहुल वाधवानी, सिद्धार्थ रणजित यांच्या खेळीच्या जोरावर पिनॅकल युनायटेड संघाने ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाचा 70-60 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. टेबल टेनिसमध्ये अजय शर्मा, निलेश खंडेलवाल, केदार नाडगोंडे, कौस्तुभ नाडगोंडे, पृथ्वी शहा, प्रोमित सूद यांच्या कामगिरीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने पिनॅकल युनायटेड संघाचा 67-52 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. टेनिसमध्ये वेदांत धाम, कौस्तुभ नाडगोंडे, केदार नाडगोंडे, प्रोमित सूद, आदित पलरेशा, निलेश खंडेलवाल यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाने पिनॅकल युनायटेड संघाचा 41-63 असा पराभव करून संघाची आघाडी वाढवली. पिकल बॉलमध्ये पिनॅकल युनायटेड संघाने ओबेरॉय अँड निल किंग्ज संघाचा 56-47 असा पराभव केला. स्क्वॅशमध्ये रणजित बाला, अरहान लुंकड, कुम्याल कुवावाला यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर पिनॅकल युनायटेड संघाने ओबेरॉय अँड निल किंग्जचा 53-25 असा पराभव केला.

निकाल: साखळी फेरी:

एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. एचके पावरहाऊस 274-249

बॅडमिंटन: एएसआर स्ट्रायकर्स पराभूत वि. एचके पावरहाऊस 58-73;

स्क्वॅश: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. एचके पावरहाऊस 35-34;

टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि.एचके पावरहाऊस 62-50;

पिकल बॉल: एएसआर स्ट्रायकर्स वि.वि. एचके पावरहाऊस 58-30;
टेबल टेनिस: एएसआर स्ट्रायकर्स पराभूत वि. एचके पावरहाऊस 61-62;

पिनॅकल युनायटेड वि.वि.ओबेरॉय अँड निल किंग्ज 272-262

बॅडमिंटन: पिनॅकल युनायटेड वि.वि.ओबेरॉय अँड निल किंग्ज 70-60;

टेबल टेनिस: पिनॅकल युनायटेड पराभुत वि.ओबेरॉय अँड निल किंग्ज 52-67;

टेनिस: पिनॅकल युनायटेड पराभुत वि.ओबेरॉय अँड निल किंग्ज 41-63;

पिकल बॉल: पिनॅकल युनायटेड वि.वि.ओबेरॉय अँड निल किंग्ज 56-47.

स्क्वॅश: पिनॅकल युनायटेड वि.वि.ओबेरॉय अँड निल किंग्ज 53-25;