May 15, 2025

पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग 2025 स्पर्धेत वेकफील्ड डिलाइट्स, स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स, एचके पावरहाऊस संघांचे विजय

पुणे, 5 मे 2025- पूना क्लब लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत साखळी फेरीत वेकफील्ड डिलाइट्स, स्टॅश प्रो. परमार ऑल स्टार्स, एचके पावरहाऊस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी मालिका कायम ठेवली.

पूना क्लबच्या टेबलटेनिस, टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश, पिकलबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात एचके पावरहाऊस संघाने एएसआर स्ट्रायकर्स संघाचा 288-254 असा पराभव केला. सामन्यात बॅडमिंटनमध्ये सनत परमार, अश्विन शहा, करण शर्मा, निरव बाफना, जयदीप दाते, मनप्रीत उप्पल यांच्या खेळीच्या जोरावर पावरहाऊस संघाने स्ट्रायकर्स संघाचा 73-57 असा तर, टेनिसमध्ये रक्षय ठक्कर, जयदीप दाते, अवीव कांजीलाल, मनप्रीत उप्पल यांच्या विजयी खेळीच्या जोरावर पावरहाऊस संघाने स्ट्रायकर्सचा 57-50 असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये संजय श्रीवास्तव, मनप्रीत उप्पल, जयदीप दाते, करण शर्मा, रक्षय ठक्कर, अवीव
कांजीलाल यांच्या खेळीच्या जोरावर पावरहाऊस संघाने स्ट्रायकर्सचा 73-62 असा तर, स्क्वॅशमध्ये पावरहाऊस संघाने स्ट्रायकर्सचा 41-34 असा संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या पिकलबॉल लढतीत एचके पावरहाऊस संघाला
एएसआर स्ट्रायकर्स संघाला 44-51 असे पराभूत केले.

दुसऱ्या लढतीत वेकफील्ड डिलाइट्स संघाने मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स संघाचा 280-270 असा पराभव करून दुसऱ्या विजयाची नोंद केली. बॅडमिंटनमध्ये राजेश बनसोडे, ब्रिन्दा, प्रकाश बूथरा, विनय मुत्याल, आदित्य राठोड, देव घुवालेवाला यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर डिलाइट्स संघाने जॅग्वार्स संघाचा 63-60 असा पराभव करून संघाचे खाते उघडले. टेनिस प्रकारात डिलाइट्स संघाने जॅग्वार्स संघाला 58-58 असे बरोबरी रोखले. टेबल टेनिसमध्ये विक्रम दामले, शैलेश मालपाणी, तानिया अंकलेसारिया, सिद्धार्थ यंदे यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर जॅग्वार्स संघाने डिलाइट्सचा 63-61 असा पराभव करून संघाला आघाडी नाममात्र प्राप्त करून दिली. स्क्वॅशमध्ये डिलाइट्स संघाने जॅग्वार्सचा 41-38 असा, तर पिकलबॉलमध्ये डिलाइट्स संघाने जॅग्वार्सचा 57-51 असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला. अन्य लढतीत स्टॅश प्रो. परमार ऑल स्टार्स संघाने मानव अव्हेंजर्स संघाचा 268-240 असा पराभव करून दुसरा विजय मिळवला.

निकाल: साखळी फेरी:
एचके पावरहाऊस वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 288-254
बॅडमिंटन: एचके पावरहाऊस वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 73-57;
टेनिस: एचके पावरहाऊस वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 57-50;
टेबल टेनिस:एचके पावरहाऊस वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 73-62;
स्क्वॅश: एचके पावरहाऊस वि.वि.एएसआर स्ट्रायकर्स 41-34;
पिकलबॉल:एचके पावरहाऊस पराभुत वि.एएसआर स्ट्रायकर्स 44-51;

वेकफील्ड डिलाइट्स वि.वि.मनप्रीत अँड जीजीज जॅग्वार्स 280-270
बॅडमिंटन: डिलाइट्स वि.वि.जॅग्वार्स 63-60;
टेनिस: डिलाइट्स बरोबरी वि.जॅग्वार्स 58-58;
टेबल टेनिस: डिलाइट्स पराभुत वि. जॅग्वार्स 61-63;
स्क्वॅश: डिलाइट्स वि.वि.जॅग्वार्स 41-38;
पिकलबॉल: डिलाइट्स वि.वि.जॅग्वार्स 57-51;

स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स वि.वि.मानव अव्हेंजर्स 268-240
बॅडमिंटन: ऑल स्टार्स वि.वि.अव्हेंजर्स 74-33;
टेनिस: ऑल स्टार्स वि.वि. अव्हेंजर्स 63-38;
टेबल टेनिस: ऑल स्टार्स पराभुत वि. अव्हेंजर्स 52-71;
स्क्वॅश: ऑल स्टार्स पराभुत वि.अव्हेंजर्स 33-40;
पिकलबॉल: ऑल स्टार्स वि.वि.अव्हेंजर्स 46-58;