May 5, 2024

भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत आर्यन किर्तने, नीव गोजिया, प्रार्थना खेडकर यांचे सनसनाटी विजय

पुणे, 1 ऑक्टोबर 2023: संदीप किर्तने टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित भारती विद्यापीठ एमएसएलटीए डेक्कन जिमखाना अखिल भारतीय मानांकन(14वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात नीव गोजिया, आर्यन किर्तने यांनी, तर मुलींच्या गटात प्रार्थना खेडकर यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा उदघाटनाचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत आर्यन किर्तने याने सहाव्या मानांकित रोहन बजाजचा 6-3, 3-6, 6-0 असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. क्वालिफायर नीव गोजियाने आठव्या मानांकित आरव पटेलचा 6-4, 7-5 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. चुरशीच्या लढतीत आदित्य अरुणने अंश रमाणीचा टायब्रेकमध्ये 6-2, 2-6, 7-6(3) असा पराभव करून आगेकूच केली. लकी लुझर ठरलेल्या मोहम्मद तल्हाने अनुराग पाटीलचे आव्हान 6-4, 7-6(5) असे संपुष्टात आणले.

मुलींच्या गटात प्रार्थना खेडकरने पाचव्या मानांकित स्वरा जावळेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. अव्वल मानांकित स्वानिका रॉयने अवनी देसाईचे आव्हान 6-0, 6-0 असे मोडीत काढले. याआधी स्पर्धेचे उदघाटन भारती विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन ऑफिस ऑफ हेल्थ सायन्सच्या उपसंचालक डॉ.अरुंधती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाचे सरचिटणीस गिरीश इनामदार, क्लबच्या वित्तीय विभागाचे सचिव मिहीर केळकर, क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव अश्विन गिरमे, स्पर्धा संचालक संदीप किर्तने, संयोजन सचिव विक्रांत साने, शेपिंग चॅम्पियन फाउंडेशनचे सहसंस्थापक राजेश गडदे, पीएमडीटीएचे हिमांशू गोसावी आणि एमएसएलटीए सुपरवायझर प्रविण झिटे आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(पहिली फेरी): मुले:
वरद उंद्रे(महा)(1)वि.वि.सिद्धांत गणेश(महा) 6-0, 6-1;
आदित्य अरुण(महा)वि.वि.अंश रमाणी(महा) 6-2, 2-6, 7-6(3);
मोहम्मद तल्हा(महा)वि.वि.अनुराग पाटील(महा) 6-4, 7-6(5);
जय गायकवाड(महा)(5)वि.वि.दिव्यांश बेहरा(महा) 6-1, 6-0;
स्मित उंद्रे(महा)(3)वि.वि.वैष्णव रानवडे(महा)6-1, 6-3;
सनत कडले(महा)वि.वि.अमोघ पाटील(महा) 6-3, 6-1;
अर्णव भाटिया(महा)(7)वि.वि.तनिश दर्जी(गुजरात)6-2, 6-1;
नीव गोजिया(महा) वि.वि.आरव पटेल(महा)(8) 6-4, 7-5;
प्रद्युम्न ताताचर(महा)वि.वि.अथर्व डकरे(महा)6-3, 6-0;
आरुष पोतदार(महा)वि.वि.अझलान शेख(महा)6-3, 6-1;
आरव ईश्वर(महा)(4)वि.वि.नमिश हुड(महा)7-5, 6-2;
आर्यन किर्तने(महा)वि.वि.रोहन बजाज(महा)(6) 6-3, 3-6, 6-0;
शौनक सुवर्णा(महा)(2)वि.वि.अथर्व येलभर(महा)6-1, 6-1;

मुली:
स्वानिका रॉय(महा)(1)वि.वि.अवनी देसाई(महा)6-0, 6-0;
विवा तलरेजा(महा)वि.वि.गीतिका पावसकर 6-0, 6-1;
काव्या देशमुख(महा)(६)वि.वि.रेवा भातखळकर(महा)6-2, 6-0;
रित्सा कोंडकर(महा)वि.वि.अवंतिका सैनी(महा)6-0, 6-1;
श्रेया होनकन(महा)वि.वि.भवानी हिरेमठ(महा)6-2, 6-1;
वैष्णवी नागोजी(महा)(8)वि.वि.मृदुला साळुंके(महा)6-1, 6-1;
प्रार्थना खेडकर(महा)वि.वि.स्वरा जावळे(महा)(5)6-0, 6-0;