पुणे, 16 ऑक्टोबर 2023 : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असून १७ ते १९ आणि २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत द्रुतगतीमार्गाच्या मुंबई आणि पुणे वाहिनीवर वाहतूक पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
१७ ऑक्टोबर रोजी पुणे वाहिनीवरील खंडाळा बोगदा कि.मी ४७/९०० व लोणावळा कि.मी. ५०/१०० येथे, १८ ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील दस्तुरी पोलीस चौकी कि.मी. ४४/८०० व खालापूर कि.मी. ३३/८००, १९ ऑक्टोबर रोजी ढेकू गाव कि.मी. ३७/८०० व कि.मी. ३७, २६ ऑक्टोबर रोजी खंडाळा बोगदा कि.मी. ४७/१२० तर खोपोली एक्झीट कि.मी. ३९/९०० वर गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरू राहणार आहे.
काम पुर्ण झाल्यावर दुपारी १ वाजता सदर वाहिनीवरील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

More Stories
पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून : विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना आनंद घेता येणार
Pune: फेरीवाल्यांना नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ
भीम फेस्टिवल २०२६ : बावधनमध्ये उत्साहात साजरी आंबेडकर जयंती