May 18, 2024

तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड खिताबांसोबत पर्सिस्टंटची ऐतिहासिक कामगिरी

पुणे, दि. १७ ऑक्टोबर २०२३ : पर्सिस्टंट सिस्टीम्स (BSE आणि NSE: PERSISTENT), या डिजिटल अभियांत्रिकी आणि एंटरप्राइझ मॉडर्नायझेशनमधील जागतिक अग्रणी कंपनीने, अलीकडे तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविले आहेत. सर्वात मोठी सायकलवर आधारीत लोगो/ प्रतिमा साकारणे, यूट्यूबवर सायकलिंग जागरूकतेचे धडे देणाऱ्या व्हिडिओच्या थेट प्रक्षेपणाला मिळविलेले सर्वाधिक प्रेक्षक आणि पर्यावरण संवर्धन तसेच कर्मचार्‍यांच्या आरोग्याप्रती असलेली बांधिलकी बळकट करण्यासाठी सायकल चालवणाऱ्या लोकांचा सर्वात मोठ्या ऑनलाइन व्हिडिओ अल्बमची घडणी अशा तीन विक्रमांची कंपनीने नोंद केली आहे.

पर्सिस्टंट सिस्टीम्सने जेव्हा आर्थिक वर्ष २०२३ मध्ये एक अब्ज डॉलरच्या वार्षिक कमाईचा टप्पा ओलांडला, तेव्हा कंपनीच्या या निरंतर यशात योगदान दिल्याबद्दल जगभरातील कर्मचार्‍यांना कौतुकाचे प्रतीक पाठवण्याचा निर्णय घेतला. कर्मचार्‍यांना त्यांची पसंती कळविलेल्या साधनांमध्ये इलेक्ट्रॉनिक ऑडिओ उपकरण, प्रवास उपकरणे आणि सायकल यांचा समावेश होता. सुमारे ९,००० कर्मचार्‍यांनी सायकलची निवड केली, ज्यामुळे पर्सिस्टंटला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड खिताबासाठी प्रयत्न सुरू करण्यास प्रवृत्त केले गेले आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्या फिटनेस प्रवासास अशा तऱ्हेने प्रोत्साहन दिले गेले.

नवीनतम विक्रमाच्या नोंदीच्या आघाडीवर, कंपनीने ७०४ सायकलींसह आपला लोगो तयार केला, ज्यातून कर्मचाऱ्यांच्या आरोग्याप्रती कंपनीचा समर्पण भाव दर्शविण्यासह आणि त्याचे प्रतीक हे कंपनीच्या ब्रँड प्रतिमेतून दर्शविले गेले. ७,३४८ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सायकल चालवण्याच्या सर्वोत्तम सराव आणि सुरक्षिततेबद्दल अधिक समजून घेण्यासाठी यूट्यूबवर सायकलिंग जागरूकता धडे देणारा व्हिडिओ थेट पाहिला. पुढे, सायकल चालवणे ही एक चळवळ बनवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना पर्यावरणपूरक वाहतुकीचा अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, कंपनीने सायकल चालवणाऱ्या लोकांचा ऑनलाइन व्हिडिओ अल्बम तयार केला, ज्यामध्ये ५,०९८ व्यक्तींनी योगदान दिले.

पर्सिस्टंटचे सीईओ आणि कार्यकारी संचालक, संदीप कालरा म्हणाले:
“आमच्या कर्मचार्‍यांचे कल्याण हा पर्सिस्टंटच्या संस्कृतीचा एक अत्यावश्यक भाग आहे आणि आमचे नेहमीच त्याला प्राधान्य राहिले आहे. आमच्या जागतिक संघातील बहुतेक सदस्यांनी अब्ज डॉलर्सच्या उलाढालीची भेट म्हणून सायकलींना पसंती दिल्याचे पाहून आम्हाला अभिमान वाटला आणि ही भावना साजरी करण्यासाठी जागतिक विक्रम रचण्यापेक्षा आणखी चांगले काय ठरेल, अशी आमची भावना बनली. तीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा खिताब प्राप्त केल्याने आमच्या कर्मचारी संघांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. मी सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो ज्यांनी हा विक्रम रचण्यात आणि सर्वांगीण कल्याणासाठी त्यांचे यथोचित समर्पण प्रदर्शित करण्यात योगदान दिले #ThePersistentWay.”