पुणे, 22 फेब्रुवारी 2023 : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्यादृष्टीने विश्रामबाग वाहतुक विभागाअंतर्गत कै. शिवराम म्हात्रे रस्त्यावरील विसावा मारुती मंदीर ते गुरुकृपा मेडीकल व पुना केमिस्ट ते पुना ड्रग या ठिकाणी पार्किंग तर पुना हॉस्पिटल समोरील १५० मीटर परिसर नो-पार्किंग करण्याबाबतचे तात्पुरते आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
याबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे-४११००६ येथे ९ मार्च पर्यंत लेखी स्वरुपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करुन अंतिम आदेश काढण्यात येणार आहेत. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
More Stories
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप, ५५ कुटुंबांना मिळणार हक्काचे पक्के घर
पुणे: पर्वतीत भाजपाची वाढली धाकधूक! मिसाळ विरोधक भिमालेंनी महापालिकेत केला अर्ज
तुम्ही यांना विधानसभेत पाठवा; पक्ष करताच पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी जाहीर