July 27, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत सीएनए संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 15 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत प्रणय सिसवाल(125धावा) याने केलेल्या धडाकेबाज शतकी खेळीसह कपिल कांबळे(6-20)च्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर सीएनए संघाने ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी संघावर 255 धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

कटारिया हायस्कुल क्रिकेट अकादमी मैदानावर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सीएनए संघाने 47 षटकात सर्वबाद 327 धावा केल्या. यात प्रणय सिसवालने 82चेंडूत 25चौकाराच्या मदतीने 125धावांची शतकी खेळी केली. त्याला आयुष मोरेने 36 धावा काढून साथ दिली. या सलामीच्या जोडीने 66 चेंडूत 84 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर प्रणय सिसवालने देवाशिष घोडके(63धावा)च्या साथीत 113 चेंडूत 140 धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला.

327धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी संघाचा डाव 28 षटकात सर्वबाद 72 धावावर संपुष्टात आला. यात पृथ्वी पालनेच्या नाबाद 29धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही.सीएनए संघाकडून कपिल कांबळे(6-20), हर्षवर्धन लडकत(3-25) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर कपिल कांबळे ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्यपुर्व फेरी:
सीएनए: 47 षटकात सर्वबाद 327 धावा(प्रणय सिसवाल 125(82,25×4), देवाशिष घोडके 63(70,10×4), आयुष मोरे 36(44,7×4), शौर्य देशमुख 21, कृष्णा पांडे 20, कपिल कांबळे 16, शिवराज 16 -49, सौम्या सावंत 1-10, पृथ्वी पलाने 1-39) वि.वि.ब्रिलियंट स्पोर्ट्स अकादमी: 28 षटकात सर्वबाद 72 धावा(पृथ्वी पालने नाबाद 29, कपिल कांबळे 6-20, हर्षवर्धन लडकत 3-25); सामनावीर-कपिल कांबळे; सीएनए संघ 255 धावांनी जिंकला.