पुणे, 10 सप्टेंबर 2024: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाना भेटी देऊन दर्शन घेतले आणि श्रीगणेशाची आरती केली. यावेळी श्री. पवार यांचा विविध मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. पवार यांनी कसबा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ, गुरुजी तालिम गणपती मंडळ, छत्रपती राजाराम मित्र मंडळ, केसरीवाडा गणेशोत्सव आणि भोलेनाथ मित्रमंडळाला भेटी देऊन दर्शन घेतले.
यावेळी कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीराचे अध्यक्ष माणिक चव्हाण, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, गुरुजी तालिम गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, छत्रपती राजाराम मित्र मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, केसरीवाडा गणेशोत्सवाच्या डॉ. गीताली टिळक आणि भोलेनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा माजी उप महापौर दीपक मानकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने तसेच मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान