May 20, 2024

डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत जय गायकवाड, दक्ष पाटील यांचा मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे, २४ एप्रिल २०२४: डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दक्ष पाटील, जय गायकवाड यांनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित आराध्य म्हसदेने प्रज्ञेश शेळकेचा ६-२,६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. आठव्या मानांकित जय गायकवाडने चौथ्या मानांकित रोहन बजाजचा ६-३, ६-२ असा पराभव उपांत्य फेरी गाठली. अति तटीच्या लढतीत सातव्या मानांकित दक्ष पाटील याने दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीचा टायब्रेकमध्ये ६-७(१४), ६-२, ७-५ असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. हा सामना ३तास ५५मिनिटे चालला. तिसऱ्या मानांकित नीव कोठारीने अंश रामाणीचा ६-३, ६-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित स्वानिका रॉयने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत शर्मिष्ठा कोद्रेचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. चौथ्या मानांकित मेहक कपूर हिने आठव्या मानांकित स्वरा जावळेचे आव्हान ६-०, ६-४ असे संपुष्टात आणले.तिसऱ्या मानांकित देवांशी प्रभुदेसाईने पाचव्या मानांकित श्रीमोइ कामतवर ६-०, ६-० असा विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित काव्या देशमुखने वैष्णवी चौहानचा ६-७(७), ६-४, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली.

दुहेरीत मुलांच्या गटात सनत कडले व समिहन देशमुख या जोडीने दुसऱ्या मानांकित रोहन बजाज व स्वर्णीम येवलेकर यांचा २-६, ७-६(५), १०-८ असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
आराध्य म्हसदे(१)वि.वि.प्रज्ञेश शेळके ६-२,६-३;
जय गायकवाड(८)वि.वि.रोहन बजाज(४)६-३, ६-२;
नीव कोठारी(३) वि.वि.अंश रामाणी ६-३, ६-१;
दक्ष पाटील(७)वि.वि.सक्षम भन्साळी(२)६-७(१४), ६-२, ७-५;

मुली:
स्वानिका रॉय(१)वि.वि.शर्मिष्ठा कोद्रे ६-०, ६-०;
मेहक कपूर(४)वि.वि.स्वरा जावळे(८)६-०, ६-४;
देवांशी प्रभुदेसाई(३)वि.वि.श्रीमोइ कामत(५)६-०, ६-०;
काव्या देशमुख(२)वि.वि.वैष्णवी चौहान ६-७(७), ६-४, ६-१;

दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: मुले:
सक्षम भन्साळी/दक्ष पाटील(१) वि.वि.आश्रित मज्जी/विवान मल्होत्रा ६-१, ६-३;
आराध्या म्हसदे/प्रद्न्येश शेळके(३) वि.वि.जय गायकवाड/आर्यन किर्तने ६-२, ६-१;
अमोघ पाटील/वीरेन सूर्यवंशी वि.वि.धनक शिखर/पार्थ सापरिया ६-४, ७-६(४);
सनत कडले/समिहन देशमुख वि.वि.रोहन बजाज/स्वर्णीम येवलेकर(२)२-६, ७-६(५), १०-८;

मुली:
मेहक कपूर/देवांशी प्रभुदेसाई(१)वि.वि.समृद्धी मिरगे/सृष्टी मिरगे ६-०, ६-०;
प्रार्थना खेडकर/जान्हवी चौगुले वि.वि.जैनब महेतकर/प्रांजली पंडुरे(४)६-२, ६-१.