May 3, 2024

डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत प्रज्ञेश शेळकेचा मानांकित खेळाडूवर विजय

पुणे, २२ एप्रिल २०२४: डेक्कन एज्युकेशन सोसायटी व शेपींग चॅम्पियन्स फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डीईएस एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन(१६ वर्षाखालील) चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकीत प्रज्ञेश शेळके याने पाचव्या मानांकित पावक चितानियाचा ६-१, ६-२ असा पराभव करून आजचा दिवस गाजवला.

फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पहिल्या फेरीत अव्वल मानांकित स्वनिका रॉयने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत जैनब महेतरचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. आरोही देशमुखने सान्वी राजूचा ६-४, ६-४ असा तर, जान्हवी चौगुलेने वीरा हरपुडेचा ७-५, ६-१ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. क्वालिफायर रित्सा कोंडकरने अनुष्का जोगळेकरचा आव्हान ६-१, ६-१ असे संपुष्टात आणले. आठव्या मानांकित स्वरा जावळेने ओवी मारणेचा ६-१, ६-१ असा सहज पराभव केला.

मुलांच्या गटात चुरशीच्या लढतीत अमोघ पाटीलने आरव ईश्वरचा टायब्रेकमध्ये ६-७(१), ६-३, १०-७ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अंश रामाणीने सिद्धेश खाडेचा ६-४, ६-७(५), ६-२ असा कडवा प्रतिकार केला. दुसऱ्या मानांकित सक्षम भन्साळीने अर्णव भाटियाला ६-२, ६-२ असे पराभूत केले. स्वर्णिम येवलेकरने सनत कडलेचा ६-४, ६-० असा तर, आदित्य योगीने आश्रित मज्जीचा ६-२, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. नीव गोगियाने अथर्व डाकरेचा ३-६, ६-३, ६-० असा तीन सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: मुले:
आराध्या म्हसदे(१)वि.वि.वीरेन सूर्यवंशी ६-१, ६-१;
आदित्य योगी वि.वि.आश्रित मज्जी ६-२, ६-३;
नीव गोगिया वि.वि.अथर्व डाकरे ३-६, ६-३, ६-०;
प्रज्ञेश शेळके वि.वि.पावक चितानिया(५)६-१, ६-२;
रोहन बजाज(४)वि.वि.श्रीनाथ कुलकर्णी ६-४, ६-३;
अमोघ पाटील वि.वि.आरव ईश्वर ६-७(१), ६-३, १०-७;
जय गायकवाड(८)वि.वि.भार्गव वैद्य ७-६(२), ६-३;
अंश रामाणी वि.वि.सिद्धेश खाडे ६-४, ६-७(५), ६-२;
अंशुल पुजारी वि.वि.विश्वजीत चौधरी ६-०, ७-६(१);
स्वर्णिम येवलेकर वि.वि.सनत कडले ६-४, ६-०;
नीव कोठारी(३) वि.वि.नील आंबेकर ६-०, ६-३;
आर्यन किर्तने वि.वि.प्रत्युश बगाडे ६-०, ६-०;
सक्षम भन्साळी(२)वि.वि.अर्णव भाटिया ६-२, ६-२;

मुली:
स्वनिका रॉय(१)वि.वि.जैनब महेतर ६-०, ६-०;
वैष्णवी नागोजी वि.वि.अवंतिका सैनी ६-३, ६-०;
रितू ग्यान वि.वि.समृद्धी मिरगे ६-३, ६-१;
मेहक कपूर(४)वि.वि.आर्या पाठक ६-०, ६-१;
आरोही देशमुख वि.वि.सान्वी राजू ६-४, ६-४;
जान्हवी चौगुले वि.वि.वीरा हरपुडे ७-५, ६-१;
स्वरा जावळे(८)वि.वि.ओवी मारणे ६-१, ६-१;
श्रीमोइ कामत(५)वि.वि.रिया बंगाळे ६-२, ७-५;
सृष्टी मिरगे वि.वि.मीरा बंगाळे ६-४, ६-४;
रित्सा कोंडकर वि.वि.अनुष्का जोगळेकर ६-१, ६-१;
देवंशी प्रभुदेसाई(३)वि.वि.सम्राज्ञी दळवी ६-२, ६-१.