May 11, 2024

सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत डॉइश बँक, इन्फोसिस संघांचे विजय

पुणे, 30 जानेवारी, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इन्फोसिस, डॉइश बँक या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
 
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अनिल तेवानी याने केलेल्या उपयुक्त 48 धावांच्या जोरावर डॉइश बँक संघाने केपीआयटी संघाचा 43 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
दुसऱ्या सामन्यात संदीप शांघाय 41 धावा व  2-19) याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर इन्फोसिस संघाने कॉग्निझंट संघाचा 87 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
 
निकाल: साखळी फेरी: 
डॉइश बँक: 20 षटकात 3बाद 169धावा(अनिल तेवानी 48(40,7×4), पंकज लालगुडे 48(34,5×4,1×6), मधु कामत 39(26,6×4), ओंकार तांदुळवाडकर नाबाद 30(15,2×4,2×6), संतोष कंक 2-17)वि.वि.केपीआयटी: 20 षटकात 9बाद 126धावा(शुभम झापडेकर 39(33,4×4,1×6), दत्तात्रय गाडे 22, सुधीर काळे 13, संतोष कंक नाबाद 18, तरण दीप सिंग 3-20, रोशन कामथ 3-11);सामनावीर-अनिल तेवानी; डॉइश बँक संघ 43 धावांनी विजयी;
इन्फोसिस:20 षटकात 7बाद  217धावा(तरुणकुमार राय नाबाद 54(22,7×4,2×6), संदीप शांघाय 41(22,5×4,2×6), सागर बिरदवडे 36(19,5×4,1×6), सुवरोजित साहू 24(23,3×6) ), हर्षद तिडके 15, राकेश चव्हाण 3-35, आनंद कोंडा 2-32)वि.वि.कॉग्निझंट: 19.4 षटकांत सर्वबाद 130धावा(सात्विक 59(40,8×4,1×6), व्यंकटेश अय्यर 14, पुनीत करण 18, निखिल रोकडे 2-2, सूरज गुप्ता 2-24, संदीप शांघाय 2-19);सामनावीर-संदीप शांघाय; इन्फोसिस संघ 87 धावांनी विजयी;