October 3, 2024

सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत डीएफए मुंबई संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे, 25 मे 2023: सीएमएस(चिंचवड मल्याळी समाज) व सीएमएस फाल्कन्स फुटबॉल क्लब यांच्या वतीने सीएमएस चॅम्पियन्स करंडक इलेव्हन-अ-साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत  डीएफए मुंबई संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
निगडी येथील मदन लाल धिंग्रा स्टेडियमवर सुरु असलेल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत डीएफए मुंबई संघाने गोरखा एफसी नांदेड संघाचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. डीएफए मुंबईकडून असद सय्यद(62मि.)याने, गोरखा एफसी नांदेडकडून अब्दुल्ला अली(64मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला व त्यामुळे पूर्ण वेळेत सामना बरोबरीत सुटला. निर्धारित सामना १-१ असा सुटल्यामुळे सामना टायब्रेकरमध्ये खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्ये डीएफए मुंबईकडून रोहन गौड, अश्रफ शेख, इब्राहिम शेख,मुबारक शेख  यांनी गोल केले. गोरखा एफसी नांदेड कडून  शाहिद एस, यश काळे यांना गोल मारण्यात अपयश आले.
याआधीच्या काल रात्री उशिरा झालेल्या सामन्यात दुसऱ्या फेरीत विवान डे(25मि.), वरुण लाड(42मि.), गौरव स्वामीनाथन(59मि.) यांनी नोंदवलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर अमर एफसी संघाने मिलन बॉईज बीड संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चुरशीच्या लढतीत सीएमएस फाल्कन्स अ संघाने जेजे युनायटेड संघाचा सडनडेथमध्ये 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपनाटयपूर्व फेरी गाठली. निर्धारित वेळेत दोन्ही संघातील सामना गोलशून्यबरोबरीत सुटला. त्यामुळे टायब्रेकरमध्ये खेळविण्यात आला. टायब्रेकरमध्येदेखील 2-2 अशी बरोबरी निर्माण झाली. सडनडेथमध्ये विजयी संघाकडून विकी राजपूत याने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.
 स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
डीएफए मुंबई: 5(असद सय्यद 62मि. रोहन गौड, अश्रफ शेख, इब्राहिम शेख,मुबारक शेख )(गोल चुकविला:-असद सय्यद) टायब्रेकरमध्ये वि.वि.गोरखा एफसी नांदेड: 3(अब्दुल्ला अली 64मि., आकाश राठोड, आदेश हेगडे)(गोल चुकविला:- शाहिद एस, यश काळे); पूर्ण वेळ: १-१;
दुसरी फेरी: 
अमर एफसी: 3 (विवान डे 25मि., वरुण लाड 42मि., गौरव स्वामीनाथन 59मि.)वि.वि.मिलन बॉईज बीड: 0;
सीएमएस फाल्कन्स अ: 3(अनुप नायर, साहिल भोकरे, विकी राजपूत)(गोल  चुकविला:- अभिषेक बोचरे, ऍशले दास,शिबू सनी) सडनडेथमध्ये वि.वि.जेजे युनायटेड: 2(रीतेश माने, तन्मय परांजपे)(गोल चुकविला:-सॅंडी एम., नीरज गोरे, अक्षय कांबळे, कौशल इनामदार); पूर्ण वेळ: 0-0; टायब्रेकर: 2-2.