April 27, 2025

पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत दिग्विजय कडियन, महेश जगदाळे, पारस गुप्ता, विजय निचानी, लक्ष्मण रावत, हिमांशू जैन यांची आगेकूच

पुणे, 12 मार्च 2025: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने व आरसीबीसी आणि अमनोरा स्पोर्टस क्लब(द फर्न) यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी मोतीलाल ओसवाल खुल्या स्नूकर स्पर्धेत दिग्विजय कडियन, महेश जगदाळे, पारस गुप्ता, विजय निचानी, लक्ष्मण रावत, हिमांशू जैन, शिवम अरोरा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना, आरसीबीसी आणि अमनोरा स्पोर्टस क्लब(द फर्न) या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत राउंड रॉबिन फेरीत हरियाणाच्या राष्ट्रीय खेळाडू दिग्विजय कादियन याने स्वप्नील बिचेचा 3-0(128(128)-00, 113(106)-00, 75-13) असा एकतर्फी पराभव करून आजचा दिवस गाजवला. दिग्विजय याने आपल्या खेळीत पहिल्या फ्रेममध्ये 128 गुणांचा हायेस्ट ब्रेक नोंदवला. त्यापाठोपाठ त्याने दुसऱ्या फ्रेममध्येदेखील 106 गुणांचा शतकी ब्रेक नोंदवला. महेश जगदाळे याने रोहन कोठारेचा 3-0(73-20, 41-43, 73-28, 61-23) असा तर, पारस गुप्ताने रोविन डिसूझाचा 3-1(78-35, 49-63, 105(97)-08, 85(65)-27) असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत विजय निचानीने राहुल नारंगचा 3-2(59-41, 48-85, 20-78(50), 63-51, 65-37) असा कडवा प्रतिकार केला.

आरसीबीसी हॉलमधील लढतीत लक्ष्मण रावतने कैवल्य जाधवचा 3-0(75-09, 76-16, 60-17) असा पराभव करून आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. फैजल खान याने अभिजीत मोरेवर 3-0(74-09, 55-30, 65-52) असा विजय मिळवला.

निकाल: राउंड रॉबिन फेरी: पीवायसी बिलियर्ड्स हॉल:
दिग्विजय कादियन वि.वि.स्वप्नील बिचे 3-0(128(128)-00, 113(106)-00, 75-13);
विजय निचानी वि.वि.राहुल नारंग 3-2(59-41, 48-85, 20-78(50), 63-51, 65-37);
महेश जगदाळे वि.वि.रोहन कोठारे 3-0(73-20, 41-43, 73-28, 61-23);
पियुष कुशवाह वि.वि.सिद्धार्थ टेंबे 3-1(69-05, 40-71, 53-17, 94-45);
पारस गुप्ता वि.वि.रोविन डिसूझा 3-1(78-35, 49-63, 105(97)-08, 85(65)-27);

आरसीबीसी हॉल:
लक्ष्मण रावत वि.वि.कैवल्य जाधव 3-0(75-09, 76-16, 60-17);
फैजल खान वि.वि.अभिजीत मोरे 3-0(74-09, 55-30, 65-52);
कनिष्क झांझारिया वि.वि.तन्मय जतकर 3-2(62-29, 37-46, 42-54, 88-09, 64-17);
हिमांशू जैन वि.वि.सुशील रसाळ 3-2(49-65, 40-55, 65-28, 72-21, 67-22);
शिवम अरोरा वि.वि.रोहित रावत 3-0(67-10, 70-49, 68-41);