November 7, 2024

डॉ. विद्या येरवडेकर यांना ऑस्ट्रेलिया च्या डीकिन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान

पुणे, १५/१०/२०२४:- ऑस्ट्रेलियाच्या डीकिन विद्यपाठाने डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस च्या प्रधान संचालिका व सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र- कुलपती यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणातील कार्याची दखल घेऊन मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.

आज, दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ रोजी नवी दिल्ली येथे डीकिन विद्यापीठाने भारतासोबतच्या ३० वर्षांच्या यशस्वी भागादीरी चे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डीकिन विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया हे जागतिक विद्यापीठांच्या शीर्ष १ % मध्ये स्थान मिळवलेले आणि भारतातील आंतरराष्ट्रीय शिक्षणात अग्रगण्य, उच्च शिक्षण, संशोधन आणि नवकल्पना आणि कौशल्य विकासामध्ये परिवर्तनशील सहभागाची ३० वर्षे साजरी करत आहे.

या कार्यक्रमात श्री. जॉन स्टॅनहॉप एएम, कुलपती, डीकिन विद्यापीठ यांनी डॉ. विद्या येरवडेकर यांचा त्यांनी उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात दिलेल्या योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट देऊन गौरव केला.