पुणे, 01 फेब्रुवारी 2024: पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेने यापूर्वी भारती विद्यापीठ, चतु:श्रृंगी व वारजे वाहतूक विभागांतर्गत काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार भारती विद्यापीठ वाहतूक विभागांतर्गत मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग ४८ च्या स्वामीनारायण मंदिरासमोर ओव्हर ब्रिज ते दरी पुलाकडे जाणाऱ्या पूर्वेकडील सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूस ४०० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.
चतु:श्रृंगी वाहतूक विभागांतर्गत चौंधे पार्क समोरील वास्तु सुंदर सहकारी गृहरचना प्रवेशद्वार क्र. १ च्या डाव्या व उजव्या बाजूस तसेच एन्क्लेव बिल्डिंग समोरील प्रवेशद्वार क्र. २ च्या डाव्या व उजव्या बाजूस १० मीटर पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे. वारजे वाहतूक विभागांतर्गत कृष्णाई प्लाझा कॅनॉल रस्ता कर्वेनगर लगतचे एमएसईबी ट्रान्सफॉर्मर स्टेशन, केळकर उपहारगृह ते आरोग्य कोठी समोरील बसवेश्वर टी हाऊस या दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना १०० मीटर पर्यंत नो पार्किंग करण्यात येत आहे.
हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही वाहतूक शाखेचे पोलीस उप-आयुक्त शशिकांत बोराटे यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

More Stories
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्पर्धामार्गावरील शाळा २३ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेनंतर बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
दहावी-बारावीच्या परीक्षा काळात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सुविधा; पुणे विभागात तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती
पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा रंगांतून साकारला