October 5, 2024

अखेर पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द

पुणे, २६ सप्टेंबर २२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार असून, स. प. कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा होणार होती. पण मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या तयारीवर पाणी फेरले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध विकास कामांचे भूमिपूजन, आणि उद्घाटनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज भूमीगतवमार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. यासोबतच इतरही विकास कामांचे भूमिपूजन आणि उ‌द्घाटनही होणार आहेत.

मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यात जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. मात्र, मोदींच्या या दौऱ्यावर पावसाचं सावट कायम आहे. मात्र बुधवारी शहरभर पावसाने थैमान घातले असून आजही जोरदार पावसाची शक्यता हवा निर्माण खात्याने व्यक्त केली आहे. दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे सभामंडप परिसरात पावसाचे पाणी आणि चिखल होऊन सर्वत्र दलदल झाली आहे. ज्या रस्त्याने मोदी स्टेजवर जाणार आहेत, त्या रस्त्यावर आणि मैदानावर सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पसरलं आहे. तसेच सभेच्या स्टेजखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, त्या ठिकाणी देखील चिखल झालेला आहे.

काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या सभा स्थळाची येऊन पाहणी केली. तसेच महापालिका आणि मेट्रो प्रशासनाला याबाबतच्या काही सूचना देखील केले आहेत. त्यानुसार काल चिखलावरती खडी टाकण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत होते. त्यासाठी खडीचे दहा ते बारा ट्रक देखील मागवण्यात आले होते. इतका आटापिटा करून देखील या ठिकाणी सभा होणे कठीण असल्याचे सध्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्थेचा विचार करण्यात येत असून त्यासाठी महापालिकेचे गणेश कला क्रीडा या सभागृहाचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे या ठिकाणी सभेची पर्यायी व्यवस्था करण्याचं काम देखील प्रशासनाकडून युद्ध पातळीवर करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.. यपरिस्थितीवर मात करून सभा यशस्वी करण्याचे आव्हान प भाजप सहप्रशासनावर राहणार आहे.

आज सकाळपासून पुणे शहर व परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे पर्यायी ठिकाणी म्हणून गणेश कला क्रीडा मंचाची निवड करण्यात आली होती. तेथे देखील सभेची तयारी सुरू करण्यात आली होती मात्र हवामानातील सुधारणा होत नसल्याने सभारद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेण्यात आलेला आहे.