पुणे, २६ सप्टेंबर २०२४ ः मुसळधार पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोसह इतर विविध विकास कामांचे उद्घाटनही पुढे ढकलेले गेले आहेत. पंतप्रधानांची वाट न पाहता मेट्रो सुरु करावी यासाठी पुणे काँग्रेसने दंड थोपटले आहेत. जर प्रशासनाने मेट्रो सुरु केली नाही तर आम्हीच ‘मेट्रो सुरु करु असा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले जर पुणे शहराला मेट्रो ३ वर्षांपूर्वी मिळाली पाहिजे होती मात्र त्याला आठ वर्ष लागली. आम्ही पुणे शहराच्या विकासाला विरोध करत नाही. म्हणून आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहणार आहोत. त्यांनी आज ऑनलाईन का होईना पण मेट्रोचे उद्घाटन करावे.
जे आज मेट्रोचे उद्घाटन झाले नाही तर उद्या सकाळी ११ वाजता आम्ही मेट्रोचे उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत आणि जर अधिकाऱ्यांनी मेट्रो रन केली नाही तर उद्यापासून त्यांच्या दालनात बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. तसेच पुण्यातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते आम्ही मेट्रोचे उद्घाटन करणार आहोत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
सुळे म्हणाल्या वाईट वाटल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द झाल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पावसामुळे मोदींचा नियोजित दौरा रद्द झाला याबद्दल खरचं वाईट वाटलं. पण जरी त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी माझी पंतप्रधान कार्यालयाला विनंती आहे की, त्यांनी शिवाजी नगर ते स्वारगेट तयार झालेल्या मेट्रो मार्ग लवकरात लवकर सुरू करावा. केवळ उद्घाटनासाठी म्हणून तयार झालेला हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या वापरासाठी थांबवून ठेऊ नये.
More Stories
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभासाठी आधार जोडणी करण्याचे आवाहन
पुण्यात कसबा मतदारसंघात भाजपमध्ये भडकले पोस्टर वाॅर, रासने घाटांची एकमेकांना आव्हान
पुणे: आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शहर भाजप मध्ये होणार अंतर्गत मतदान