पुणे,दि.7 मार्च 2023 पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कॉर्नर पॉकेट टायगर्स, ड्रॅगन बॉल, कॉर्नर पॉकेट लायन्स, कॉर्नर पॉकेट वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदु जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत कॉर्नर पॉकेट लायन्स संघाने बीपीसीएल एनर्जायझर्स संघाचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. पहिल्या सामन्यात कॉर्नर पॉकेट लायन्सच्या अनुराग गिरीने बीपीसीएलच्या राष्ट्रीय विजेता खेळाडू मनन चंद्राचा 44-05, 70-46, 59-06 असा सहज पराभव करून संघाचे खाते उघडले. दुसऱ्या सामन्यात कॉर्नर पॉकेट लायन्सच्या दिलीप कुमारने शाहबाज खानचा 35-25, 00-(70)71, 02-33, 85(85) )-09, 37-27) असा पराभव करून संघाला विजय मिळवून दिला. दिलीप कुमारने आपल्या खेळीत चौथ्या फ्रेममध्ये 85 गुणांचा ब्रेक नोंदवला.
चुरशीच्या लढतीत मोहम्मद हुसेन खान, केतन चावला यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट टायगर्स संघाने द बॉईज संघाचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव केला. ड्रॅगन बॉल संघाने कॉर्नर पॉकेट शूटर्स संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले. विजयी संघाकडून आशियाई स्नुकर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्मण रावत, ध्वज हरिया यांनी सुरेख खेळ केला. संघर्षपूर्ण लढतीत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने पीवायसी जायंट्स संघाचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली कॉर्नर पॉकेट वॉरियर्सकडून जागतिक स्नुकर स्पर्धेतील कांस्य पदक विजेता शिवम अरोरा, शोएब खान यांनी अफलातून कामगिरी केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी:
ड्रॅगन बॉल वि.वि.कॉर्नर पॉकेट शूटर्स 2-0 (लक्ष्मण रावत वि.वि.संकेत मुथा 43-08, 81-35, 29-18; ध्वज हरिया वि.वि.तहा खान 46-21, 66-33, 37-07);
कॉर्नर पॉकेट टायगर्स वि.वि.द बॉईज 2-1(मोहम्मद हुसेन खान वि.वि.सुमेर मागो 55-00, 72-62, 24-43, 42-55, 45-06; पियुष कुशवा पराभुत वि.दिग्विजय कडीयन 27-37,19-59,15-36; केतन चावला वि.वि.क्रिश गुरबक्सानी 43(43)-00, 60(53)-00, 21-28, 76-04);
कॉर्नर पॉकेट लायन्स वि.वि.बीपीसीएल एनर्जायझर्स 2-0(अनुराग गिरी वि.वि.मनन चंद्रा 44-05, 70-46, 59-06; दिलीप कुमार वि.वि.शाहबाज खान 35-25, 00-(70)71, 02-33, 85(85) )-09, 37-27);
कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.पीवायसी जायंट्स 2-1 (संदीप गुलाटी पराभुत वि.अभिजित रानडे 34-19, 57-59, 17-42, 28-72; शिवम अरोरा वि.वि.विजय निचानी 40-11, 00-(74)74, 07-36, 55-32, 36-23; शोएब खान वि.वि.राजवर्धन जोशी 45-27, 75-33, 18-307 46-54, 63-38).
More Stories
भाषिक कौशल्यातून रोजगाराच्या अनेक संधी: प्रो. पराग काळकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हिंदी दिवस सोहळा आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम संपन्न
केंद्र सरकारच्या सहकारी संस्थांबाबतच्या नवीन कायद्याची माहिती घेऊन विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी व्यवसाय उभे करावेत – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील