December 13, 2024

पहिल्या पुनित बालन-केदार जाधव मेगा क्लब चॅम्पियनशिप(14 वर्षांखालील)क्रिकेट स्पर्धेत गॅरी कर्स्टन, जस क्रिकेट, पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी संघांचा विजय

पुणे, 2 मार्च 2023: पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित पहिल्या पुनित बालन- केदार जाधव मेगा क्लब (14 वर्षांखालील) चॅम्पियनशिप क्रिकेट स्पर्धेत गॅरी कर्स्टन, जस क्रिकेट व पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला.

डिझायर स्पोर्ट्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात अथर्व वाघच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने विराग आवटे संघाचा 143 धावांनी पराभव करत स्पर्धेत पहिला विजय मिळवला. पहिल्यांदा खेळताना पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने 50 षटकांत 8 बाद 259 धावा केल्या. अथर्व वाघने 107 चेंडूत 7 चौकारांसह 92 तर अर्णव पाटीलने 77 चेंडूत 4 चौकारांसह 70 धावा करून संघाचा डाव भक्कम केला. 259 धावांच्या आव्हानाचा सामना करताना अथर्व वाघ ,शर्विल नाकटे व ताबिश सय्यद यांच्या अचूक गोलंदाजीपुढे विराग आवटे संघ 40.4 षटकांत सर्वबाद 116 धावांत गारद झाला. 92 धावा व 3 गडी बाद करणारा अथर्व वाघ सामनावीर ठरला.

व्हिजन क्रिकेट अकादमी येथे झालेल्या सामन्यात संवाद गायकवाडच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर गॅरी कर्स्टन संघाने स्पोर्टिव्ह संघाचा 257 धावांनी दणदणीत पराभव केला. लेजेन्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात हर्षदीप सिंगच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जस क्रिकेट संघाने आर्यन्स संघाचा 5 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
गॅरी कर्स्टन: 50 षटकांत 6 बाद 305 धावा(संवाद गायकवाड नाबाद 106(98,14×4,1×6), अलाप पंगू 41(34,5×4,1×6), आयुष नवाळे 32(37,5×4,1×6), कुलवंश वाकोड 30(35,6×4), अर्जुन पवार 1-31) वि.वि स्पोर्टिव्ह: 12.2 षटकांत सर्वबाद 48 धावा (स्वयं कांबळे 13, शुभम भुईटे 6-20, आयुष नवले 4-26) सामनावीर-संवाद गायकवाड
गॅरी कर्स्टन संघ 257 धावांनी विजयी

आर्यन्स: 50 षटकात 9 बाद 179 धावा (शौनक शेवडे 45(66,9×4), आदर्श रावल 31(37,4×4) अर्पण धार 3-34, यशराज शिंदे 1-11, हर्षदीप सिंग 1-29) पराभूत वि जसक्रिकेट: 50 षटकात 5 बाद 183 धावा (हर्षदीप सिंग नाबाद 66(67,10×4,1×6), क्षितिज भालेराव 55(90,7×4), रॉनी पोतदार नाबाद 19(41,2×4), आदर्श रावल 3-21) सामनावीर-हर्षदीप सिंग
जस क्रिकेट संघ 5 धावांनी विजयी

पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी: 50 षटकांत 8 बाद 259धावा (अथर्व वाघ 92(107,7×4), अर्णव पाटील 70(77,4×4), वेदांत पाटेकर 24, स्वराज गायकवाड 5-49, अर्जुन थोरात 2-43) वि.वि विराग आवटे: 40.4 षटकांत सर्वबाद 116 धावा(स्वराज गायकवाड 26, अथर्व वाघ 3-18, शर्विल नाकटे 3-26, ताबिश सय्यद 2-12) सामनावीर- अथर्व वाघ
पुनित बालन आणि केदार जाधव क्रिकेट अकादमी संघ 143 धावांनी विजयी