December 13, 2024

१२वीच्या निकालात मुलींनी मारली बाजी, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्याचा निकाल घटला

पुणे, २५ मे २०२३: केंद्रीय लोकसभा आयोगाच्या परीक्षांमध्ये नुकतीच मुलींनी बाजी मारलेली असताना हाच ट्रेंड राज्याच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये देखील दिसला आहे राज्यभरात मुलांपेक्षा मुलींचे बारावी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. दुपारी दोन नंतर विद्यार्थ्यांना ‘mahresult.nic.in‘,
https://hsc.mahresults.org.in‘,
http://hscresult.mkcl.org‘ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. यात १४लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 2.5 टक्क्याने निकाल घटना आहे.
राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी९३.३४ टक्के इतकी आहे.

सर्व विभागीय मंडळातून ९३.७३ टक्के विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या असून ८९.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी जास्त आहे.
सर्व शाखांमधून ३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ८२.३९ आहे.

असा आहे १२वीचा निकाल
– ९३.४३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण
– एकूण विषय संख्या : १५४
– १०० टक्के निकाल लागलेल्या विषयांची संख्या : २३

शाखानिहाय निकालाची टक्केवारी
शाखा : उत्तीर्णतेची टक्केवारी
विज्ञान : ९६.०९ टक्के
कला : ८४.०५ टक्के
वाणिज्य : ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम : ८९.२५ टक्के

विभागनिहाय उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी
विभागीय : उत्तीर्णतेची टक्केवारी
पुणे : ९३.३४ टक्के
नागपूर : ९०.३५ टक्के
औरंगाबाद : ९१.८५ टक्के
मुंबई : ८८.१३टक्के
कोल्हापूर : ९३.२८टक्के
अमरावती : ९२.७५टक्के
नाशिक : ९१.६६ टक्के
लातूर : ९०.३७टक्के
कोकण : ९६.०१टक्के