पुणे, ०४ मे २०२६: पुणे जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित अशा सुपर डिव्हीजन श्रेणी फुटबॉल 2026 स्पर्धेत साखळी फेरीत जीओजी एफसी, स्निग्मय पुणे एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा संघर्षपूर्ण पराभव केला.
बावधन येथील हॉटफूट फुटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या लढतीत फेबिंदास डी(4,12,28,49मि.) याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर स्निग्मय पुणे एफसी संघाने चेतक एफसी संघाचा 9-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या लढतीत जीओजी एफसी संघाने न्यू इंडियन सॉकर क्लबचा 7-2 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून सतीश हवालदार(2,72मि.), सुमित भंडारी(14,50मि.) यांनी प्रत्येकी गोल तर, प्रेमकुमार भोयर(42मि.), साकेत कुलकर्णी(56मि.), हर्षवर्धन शिंदे(75 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. पराभूत संघाकडून झेफनी मेनेझेस(36,40 मि.) याने दोन गोल केले.
अन्य लढतीत डेक्कन इलेव्हन संघाने दिएगो ज्युनियर एफसी संघाला 3- 3 असे बरोबरीत रोखले. डेक्कन इलेव्हन संघाकडून शिवराज देशमुख(5,10,45 मि.) याने तीन गोल केले. दिएगो ज्युनियर एफसी संघाकडून ऑलविन ज्ञानप्रकाश(14मि.) याने एक गोल, मिझान तांबोळी(27,46 मि.) याने दोन गोल केले.
निकाल: साखळी फेरी:
जीओजी एफसी: 7(सतीश हवालदार 2,72 मि., सुमित भंडारी 14,50मि., प्रेमकुमार भोयर 42 मि., साकेत कुलकर्णी 56 मि., स्वयंगोल हर्षवर्धन शिंदे 75 मि.) वि.वि.न्यू इंडियन सॉकर क्लब: 2(झेफनी मेनेझेस 36, 40 मि.);
डेक्कन इलेव्हन: 3 (शिवराज देशमुख 5,10,45 मि.) बरोबरी वि.दिएगो ज्युनियर एफसी: 3 (ऑलविन ज्ञानप्रकाश 14 मि., मिझान तांबोळी 27,46 मि.);
स्निग्मय पुणे एफसी: 9 (फेबिंदास डी 4,12,28,49 मिनिट., सचिन चंदेल 17 मि., सचिन बंगेरा 36 मि., गुलाम अन्सारी 55 मि., यश परदेशी 56 मि., आदर्श माचे 72 मि.) वि.वि. चेतक एफसी: 0;

More Stories
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत ट्रिनिटी व पीबीसीए यांच्यात अंतिम लढत
पाचव्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकादमी(पीबीसीए) संघांची विजयाची हॅट्ट्रिक
एमएसएलटीए – नवसह्याद्री क्रीडा संकूल अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशीप सिरीज(14वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत देशभरांतून 150हून अधिक खेळाडू सहभागी