June 8, 2026

एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत सयान कुवड, देवहुती चव्हाण यांचे मानांकित खेळाडूंवर विजय

पुणे, 5 मे 2026: आदित्य व कैफी टेनिस अकादमी यांच्या वतीने व शेपिंग चॅम्पियन्स फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने आयोजित एमएसएलटीए पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज 12 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत सयान कुवड, देवहुती चव्हाण यांनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वे रोड येथील टेनिस कोर्टवर सुरू या स्पर्धेत मुख्य ड्रॉ दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात सयान कुवड याने आठव्या मानांकित आरव पालचा 6-3, 6-3 असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला. महाराष्ट्राच्या अव्वल मानांकित आरुष देशपांडेने कर्नाटकच्या अनुप शिरूरवर 6-0, 6-1 असा विजय मिळवला. प्रांशूल पुजारी याने विआन गोयलवर 6-0, 6-0 असा एकतर्फी विजय मिळवला.

मुलींच्या गटात अव्वल मानांकित समायरा चौधरीने काव्या हळदुळे चा 6-3,6-0 असा पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली. बिगर मानांकित देवहुती चौहानने चौथ्या मानांकित यायरा सॅमसनचा 6-1, 6-0 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. पाचव्या मानांकित सान्वी धात्रकने मिश्का सेहगलचा 6-0, 6-1 असा तर, वेदिका भोईटेने यज्ञा कुचेवारचा 6-0, 6-1 असा पराभव केला.

निकाल: मुख्य ड्रॉ: दुसरी फेरी: मुले:
आरुष देशपांडे(1)(महाराष्ट्र) वि.वि.अनुप शिरूर(कर्नाटक)6-0, 6-1;
प्रांशूल पुजारी(महाराष्ट्र) वि.वि.विआन गोयल(महाराष्ट्र)6-0, 6-0;
पलाश रुचंदानी(3)(महाराष्ट्र)वि.वि.अभिमन्यू चव्हाण(महाराष्ट्र)6-4, 6-3;
सयान कुवड(महाराष्ट्र)वि.वि.आरव पाल(8)(महाराष्ट्र)6-3, 6-3;
द्रोण डावखर(महाराष्ट्र) वि.वि.अर्जुन बेंद्रे(महाराष्ट्र)6-7(6), 6-2, 6-4;
आदित्य उपाध्ये(4)(महाराष्ट्र) वि.वि.पार्थ बऱ्हाळे(महाराष्ट्र)6-2, 6-0;
विवान साखरे(महाराष्ट्र) वि.वि.ऋषिकेश चव्हाण(महाराष्ट्र) 6-1, 6-3;
मंतव्य शर्मा(2)(पंजाब) वि.वि.
रियान पाटील(महाराष्ट्र)6-4, 6-2;

मुली:
समायरा चौधरी(1)(महाराष्ट्र) वि.वि.काव्या हळदुळे(महाराष्ट्र) 6-3, 6-0;
आर्या कुलकर्णी(6)(महाराष्ट्र) वि.वि.तेजस्विनी घोडविंदे(महाराष्ट्र) 6-3, 6-1;
देवहुती चौहान(महाराष्ट्र) वि.वि.यायरा सॅमसन(4)(महाराष्ट्र)6-1, 6-0;
सान्वी धात्रक(5)(महाराष्ट्र) वि.वि.मिश्का सेहगल(महाराष्ट्र)6-0, 6-1;
वेदिका भोईटे(महाराष्ट्र) वि.वि.यज्ञा कुचेवार(महाराष्ट्र)6-0, 6-1;
कनिष्का सिंग नारुका(2)(महाराष्ट्र) वि.वि.अंशिका मोगल(महाराष्ट्र)6-0, 6-4;
हृदवी लिमकर(महाराष्ट्र)वि.वि.अनघा कदम(महाराष्ट्र)6-4, 6-3;

You may have missed