September 10, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त अभिवादन

पुणे, 23 मार्च 2023- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शहीद दिनानिमित्त गुरुवार दिनांक २३ मार्च २०२३ रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे आणि कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अधिष्ठाता डॉ.विजय खरे, जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ.अपर्णा राजेंद्र, आजीवन अध्ययन व अध्यापन केंद्राचे संचालक डॉ.विलास आढाव, अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र घोडे, मुकुंद पांडे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक शिक्षकेतर, विद्यार्थी आदी यावेळी उपस्थित होते.