पुणे, दि. १९ मे, २०२३: नुकत्याच झालेल्या आय.सी.एस.सी इयत्ता दहावीच्या परीक्षेत डी एस के शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल दरवर्षी प्रमाणे याही वर्षी १००% लागला आहे. पृथ्वीराज खेडेकर या विद्यार्थ्याने ९७.८३% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला.
तर ९७.६७% प्राप्त करीत किमया खोरणा ही द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. याबरोबरच अनेका ग्यानपवार, क्रिती कुलकर्णी, ओम सोलासकर, वरिजा कुलकर्णी, वेदांत कुरुळेकर यांनी ९७.५०% प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला आहे. शाळेच्या या यशात माननीय मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
More Stories
फिनिक्स मॉल ते खराडी दरम्यान, दुमजली उड्डाणपूलाचे श्रेय घेण्यासाठी आजीमाजी आमदार सरसावले, राज्य सरकारने दिली मंजूरी
पुण्यातील टेकड्यांना हात लावू देणार नाही, ग्रीन पुणे मुव्हमेंटचा इशारा
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्याकडून पानशेत व वरसगाव धरणाची पाहणी