June 14, 2024

कसबा मतदारसंघात उमेदवारांच्या उपस्थितीत निवडणूक निरीक्षकांची बैठक संपन्न

पुणे, 11 फेब्रुवारी 2023: कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, निवडणूक पोलिस निरीक्षक अश्विनी कुमार आणि खर्च निरीक्षक मंझरूल हसन यांच्या प्रमुख उपस्थितीत पोटनिवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमवेत निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख, कसबा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका बारटक्के आदी उपस्थित होते.

यावेळी उमेदवारांना निवडणूक प्रक्रीयेविषयी माहिती देण्यात आली. निवडणूक पादर्शक करण्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणूक आदर्श आचारसंहिता आणि खर्च विषयक नियमावली विषयीदेखील माहिती उमेदवारांना देण्यात आली.