July 24, 2024

पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीतील भारताच्या निकी पूनाचाचे आव्हान संपुष्टात

पुणे, 27 फेब्रुवारी 2023: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर 100 पुरूष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीच्या अंतिम चरणात भारताच्या वाईल्डकार्ड द्वारे प्रवेश केलेल्या निकी कालियांदा पूनाचा याला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत झेक प्रजासत्ताकच्या अकराव्या मानांकीत डोमिनिक पालन याने भारताच्या निकी कालियांदा पूनाचा याचा 6-4, 6-1 असा पराभव करत भारताचे पात्रता फेरीतील आव्हान संपुष्टात आणले.

जागतिक क्रमांक 359 असलेल्या दक्षिण कोरियाच्या सातव्या मानांकीत युनसेंग चुंग याने 1तास 25मिनीट चाललेल्या समान्यात जागतिक क्रमांक 299 असलेल्या ग्रेट ब्रिटनच्या अव्वल मानांकीत जय क्लार्क याच 7-6(0), 6-3 याचा असा पराभव करत मुख्य फेरीत धडक मारली. जपानच्या बिगर मानांकीत माकोटो ओचीने स्पेनच्या आठव्या मानांकीत कार्लोस सांचेझ जोवरचा 6-2, 6-4 असा एकतर्फी लढतीत पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
सर्बियाच्या दुस-या मानांकीत निकोला मिलोजेविक याने ऑस्ट्रेलियाच्या डेने केली याचा 7-6(0), 6-4 असा तर ऑस्ट्रेलियाच्या अकिरा सँटिलन याने नॉर्थ मारियाना आयलँडरच्या कॉलिन सिंक्लेअर याचा 6-7(5), 7-5, 6-2 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत मुख्य फेरीत धडक मारली.

मुख्य ड्रॉच्या पहिली फेरीत एकेरी गटात इटलीच्या जागतिक क्रमांक 178 असलेल्या पाचव्या मानांकीत फ्रान्सिस्को मेस्ट्रेली याने ऑस्ट्रेलियाच्या मार्क पोलमन्स याचा 1-6, 6-1, 6-2 असा तर जपानच्या जागतिक क्रमांक 210 असलेल्या आठव्या मानांकीत रिओ नोगुची याने झेक प्रजासत्ताकच्या मारेक गेंजेल 4-6, 6-2, 7-6(1) असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

उद्या सुरू होणा-या मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत प्रज्ञनेश गनस्वरन, सुमित नागल, ससीकुमार मुकुंद आणि अर्जुन कढे या चार भारतीय खेळाडूंचे एकेरीतील सामने सुरु होणार आहेत.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम पात्रता फेरी
युनसेंग चुंग (दक्षिण कोरिया) (7) वि.वि जय क्लार्क(ग्रेट ब्रिटन)(1) 7-6(0), 6-3
निकोला मिलोजेविक(सर्बिया)(2) वि.वि डेने केली (ऑस्ट्रेलिया)7-6(0), 6-4
बेंजामिन लॉक (झिम्बाब्वे) पुढेचाल वि अलिबेक कचमाझोव(रशिया)(4)
माकोटो ओची (जपान) वि.वि कार्लोस सांचेझ जोवर (स्पेन) (8)6-2, 6-4
डोमिनिक पालन(झेक प्रजासत्ताक)(11) वि.वि निकी कालियांदा पूनाचा (भारत)6-4, 6-1
अकिरा सँटिलन(ऑस्ट्रेलिया) वि.वि कॉलिन सिंक्लेअर (नॉर्थ मारियाना आयलँडर)6-7(5), 7-5, 6-2

मुख्य ड्रॉ- पहिली फेरी- एकेरी गट
फ्रान्सिस्को मेस्ट्रेली (इटली) [5] वि.वि मार्क पोलमन्स (ऑस्ट्रेलिया) 1-6, 6-1, 6-2
रिओ नोगुची (जपान) [8] वि.वि मारेक गेंजेल ( झेक प्रजासत्ताक) 4-6, 6-2, 7-6(1)