October 13, 2024

शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक

पुणे, १२/०६/२०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.त्याला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातून अटक केली. सागर बर्वे (वय 34) असे आरोपींच नाव आहे.सागर बर्वे आयटी इंजिनिअर आहे.

त्याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यानंतर आरोपी बर्वेला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी (Police सुनावली आहे. या प्रकरणात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात मुंबई गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील तपास करत विविध पथके तयार करण्यात आली होती.

त्यानंतर त्याला अटक केले आहे. दरम्यान, आरोपीची कसून चौकशी सुरू असून आरोपीने पवार यांना का धमकी दिली, याबाबत तपास करण्यात येत आहे.