पुणे, ९ जून २०२५ ः चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने अलीकडील काळात दाखल झालेल्या मालमत्ता चोरीच्या तीन गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत, सुमारे २२ लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते सदर मुद्देमाल मूळ फिर्यादींना परत करण्यात आला आहे.
तीन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मोठ्या प्रमाणात जप्ती
गेल्या दोन महिन्यांत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात खालीलप्रमाणे तीन गुन्हे दाखल झाले होते:
गु.र.क्र. १८५/२०२५ – भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०६
गु.र.क्र. २००/२०२५ – कलम ३०५ (अ) आणि ३०६
गु.र.क्र. २०८/२०२५ – कलम ३०३ (२)
या तिन्ही प्रकरणांत पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपासाद्वारे आरोपींना अटक केली. आरोपींकडून ३६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले, ज्यांची एकूण किंमत अंदाजे २२ लाख रुपये इतकी आहे.
आयुक्तांच्या हस्ते सुपूर्तगीरीचा औपचारिक कार्यक्रम
सदर जप्त दागिने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना औपचारिकपणे सुपूर्त करण्यात आले. यावेळी फिर्यादींनी आपल्या हरवलेल्या मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याने समाधान व्यक्त केले आणि पुणे पोलिसांचे आभार मानले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व तपास पथकाचे कौतुकास्पद कार्य:
या कारवाईसाठी पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामध्ये सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त (परिक्षेत्र ४) हिंमत जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांचा देखरेखीखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक आश्विनी ननवरे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील आणि तपास पथकातील अंमलदार श्रीकांत वाघवले, श्रीधर शिर्के, बाबुलाल तांदळे, इरफान मोमीन, बाबा दांगडे यांनी ही यशस्वी कारवाई केली.
More Stories
पुणे मेट्रोचे खडकी स्थानक उद्यापासून प्रवासी सेवेत
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पुण्याकडे प्रस्थान; हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालं वातावरण
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार