April 25, 2024

लष्करी वैद्यकीय सेवेतील ब्रिगेडियर’ची रेल्वे स्थानक येथे आत्महत्या

पुणे, 19 एप्रिल 2021: लष्करी वैद्यकीय सेवेतील ब्रिगेडियर अनंत नाईक यांनी रविवारी (दि.18) दुपारी पुणे रेल्वे स्थानक येथे आत्महत्या केली. ते लष्करी वैद्यकीय महाविद्यालय येथे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन या विभागाच्या प्रमुखपदी कार्यरत होते.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, दिवंगत ब्रिगेडियर नाईक हे भुवनेश्वर येथील रहिवासी आहेत . रविवारी सकाळी ते सरकारी गाडीने ड्रायव्हर बोडके सोबत पुणे रेल्वे स्टेशन येथे आले. ड्रायव्हर बोडके यास मी एम सी ओ मधून जाऊन येतो असे सांगून पुणे रेल्वे स्टेशन येथे आले. त्यांनी सकाळी १२.१५ मि. वाजता उद्यान एक्सप्रेस चा गाडीचा इंजिन पुढे येऊन आत्महत्या केली. ही घटना प्लॅटफॉर्म क्रमांक ३ येथे घडली. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे सुसाईड नोट आढळली नाही. त्यांच्या आत्महत्येबाबत ची माहिती त्यांचा मुलगा अभिषेक नाईक यास फोन द्वारे कळवली. अभिषेक याने तो आल्यानंतरच पोस्टमार्टम करण्याबाबतची विनंती केल्याने पीएम उद्या  करण्याचे ठरविले आहे.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार-संतोष कांबळे याने पोलिसांना याबाबत माहीती दिली. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज मध्ये ब्रिगेडियर नाईक हे प्लॅटफॉर्म नंबर एक या ठिकाणी फिरत असताना दिसत आहेत. तसेच त्यांनी चेन्नई एक्सप्रेस खाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो यशस्वी झाला नाही. असे सीसीटीव्ही  फुटेजमध्ये दिसत आहे. पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील यांनी घटनास्थळाला व  त्यांच्या कार्यालयास भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.