पुणे, 11 मे, 2023 : पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या वतीने पीएमडीटीए – पुरुष व महिला जिल्हा टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत निशित रहाणे व रमा शहापुरकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरूष गटात विजेतेपदाच्या लढतीत दुस-या मानांकीत निशित रहाणे याने अव्वल मानांकीत प्रणव गाडगीळला 4-0, 4-2 असा पराभवाचा धक्का देत विजेतेपद पटकावले. निशित बीएमसीसी महाविद्यालात वाणिज्य शाखेत दुस-या वर्षात शिकत असून पीवायसी हिंदू जिमखाना येथे प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
महिला गटात विजेतेपदाच्या लढतीत चौथ्या मानांकीत रमा शहापुरकरने वैष्णवी सिंगचा 5-3, 4-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. रमा डीवाय पाटील महाविद्यालयात प्रथम वर्ष लॉ शिकत असून प्राधिकरण जिमखाणा टेनिस कोर्ट येथे प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
महिन्याच्या अखेरीस सोलापूर येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्ये व उप विजेते खेळाडू पुणे विभागाचे प्रतिनिधित्व करेल.
विजेत्या व उप विजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखाना क्लबच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा सुपरवायझर सरदार ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: पुरुष:
प्रणव गाडगीळ(1)वि.वि. व्यंकटेश आचार्य(4) 4-0,5-4(3)
निशित रहाणे(2) वि.वि. पार्थ चिवटे(3) 4-0, 4-0
अंतिम फेरी- निशित रहाणे(2) वि.वि. प्रणव गाडगीळ(1) 4-0, 4-2
महिला: उपांत्य फेरी:
रमा शहापुरकर(4) वि.वि तन्वि तावडे(1) 4-0, 4-2
वैष्णवी सिंग वि.वि आशी छाजेड 4-1, 1-4, 4-0
अंतिम फेरी: रमा शहापुरकर(4) वि.वि वैष्णवी सिंग 5-3, 4-1
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा