पुणे, २५ नोव्हेंबर २०२४ : लोकसभा निवडणूक संपली, विधानसभा निवडणूक संपली पण आता महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेच्या निवडणुकांना झाल्यामुळे राजयकी कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. तर, नागरिक सुविधा मिळत नसल्याने बेचैन आहेत. आता तरी महापालिका निवडणुका लागतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेच्या सभागृहाची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात आली. प्रभाग रचना,लोकसंख्या आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून न्यायलयीन वाद निर्माण झाल्याने या निवडणूका थांबल्या, त्यास अडीच ते तीन वर्ष होत आली. विधानसभेनंतर निवडणूका होणार, असे गाजर ही पक्षाकडून इच्छुकांना दाखविण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर महापालिका निवडणुकांबाबत इच्छुकांकडून विचारणा सुरू झाली आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यामुळे चार वॉर्डाचा मिळून एक प्रभाग या पद्धतीने महापालिका निवडणूका होतील,असा विश्वासही भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी महापालिकेकडून प्रभाग रचनेचे प्रारूप अंतिम करून ते निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. त्यास मान्यता मिळण्यापूर्वीच राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे प्रभाग रचना तशी पडून आहे. दरम्यानच्या कालवधीत पुणे महापालिकेच्या हद्दीतून उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे वगळली गेली. त्यामुळे महापालिकेने यापूर्वी तयार केलेली प्रभाग रचनेमध्ये बदल होणार की आहे तीच लागू होणार लागू करणार याबाबतही दावे-प्रतिदावे सुरू आहेत. विधानसभेच्या निवडणुकांच्या ऐन कालावधी आयोगाने महापालिकेला पत्र पाठवून दोन गावे वगळल्यामुळे महापालिकेची लोकसंख्या किती कमी झाली, याबाबत विचारणा केली होती. त्यामुळेही विधानसभा निवडणूका संपल्यानंतर महापालिका दोन ते तीन महिन्यात निवडणूका होणार, या चर्चेला जोर आला होता. त्यातच विधानसभा निवडणुकीत महायुतील मोठे यश मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक सुरू झाले आहे. फेब्रुवारीच्या माध्यमातून परिक्षा सुरू होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात या निवडणूका होतील, असा एक अंदाज नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. महापालिका हद्दीतून दोन गावे वगळले गेल्यामुळे प्रभाग रचना नव्याने करावी लागणार आहे. त्यासाठी किमान दोन ते तीन महिन्यांच्या कालावधी लागेल, असेही एक कारण काही जणांकडून सांगितले जात आहे. तर निवडणुकांच्या दृष्टीने महापालिकेची यापूर्वीच सर्व तयारी झालेली नाही. त्यामुळे राज्य शासनाकडून आदेश आल्यानंतर काही दिवसांमध्ये प्रभाग करणे शक्य आहे. त्यास फार मोठा कालावधी हवा, अशी गरज नाही, असे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु या निमित्ताने आता महापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने लवकरच हलचाली सुरू होतील, हे मात्र स्पष्ट झाले आहे.
महापालिका प्रभाग पद्धतीने घ्याव्यात का, किती वॉर्डांचा मिळून प्रभाग असावा, यावरून यापूर्वी अनेकदा चर्चा झाल्या आहेत. चार वॉर्डंचा मिळून एक प्रभाग असावा, अशी भूमिका भाजपची आहे. तर दोनचा वॉर्डचा मिळून एक प्रभाग असावा, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची आहे. भाजपसोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीमध्ये आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच महायुतीने महापालिका निवडणूका एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला, तर प्रभाग रचनेवरून फारसा वाद होण्याची शक्यता नाही. मात्र स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर या मुद्यावरून वादविवाद होण्याची अधिक शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
न्यायालयात ३० याचिका
प्रभाग रचना, मराठा आरक्षणासह विविध मुद्यांवरून सर्वोच्च न्यायालयात सुमारे ३० हून याचिका दाखल आहेत. या सर्व याचिका प्रलंबित आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या झोळीत भरघोस मते टाकले. महायुतीचे सरकार सर्वोच्च न्यायालयातील याचिका निकाली काढण्यासाठी दृष्टीने गतीने प्रयत्न करतील, अशी अपेक्षाही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
More Stories
विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाकरिता वाहनतळासाठी खासगी जागा अधिग्रहित करण्याचे आदेश जारी
पुणे: २० टन राडारोडा, २० टन कचरा केला गोळा; सलग दुसर्या दिवशी सर्वंकष स्वच्छता
शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय पुस्तक न्यास (NBT)’, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने “पुणे पुस्तक महोत्सव २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.