July 24, 2024

वाहतूक तक्रार निवारणाचे अधिकाऱ्यांचे आश्वासन -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, 28/06/2023: छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील वाहतुकीच्या तक्रारी निवारण्याचे आश्वासन महापालिका आणि पोलीस खात्याने दिले आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितली.

छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील वाहतूक समस्या व त्यावरील उपाययोजना याबाबत पोलीस खात्याच्या वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर आणि पुणे महापालिकेच्या वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच नागरिक यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.

वाहतुकीसंबंधात नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींचे तातडीने निवारण व्हावे, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी बैठकीत दिल्या. औंध परिसर, घोले रोड परिसर, दीप बंगला चौक परिसर, पुणे विद्यापीठ चौक, जुना पुणे मुंबई हायवे परिसर, बोपोडी परिसर, खडकी परिसर येथील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. याबरोबरच पी१, पी२, नो पार्किंग, गतिरोधक, अशा विविध समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

याप्रसंगी पोलीस खात्याच्या वाहतूक विभागातील पोलीस हवालदार सतीश सोनवणे (चतुःश्रुंगी वाहतूक विभाग), पोलीस नायक रवींद्र शेंडगे (चतुःश्रुंगी वाहतूक विभाग), पोलीस शिपाई सागर वाघमारे (चतुःश्रुंगी वाहतूक विभाग), पोलीस हवालदार शिवाजी कुचेकर (बंडगार्डन वाहतूक विभाग), पोलीस हवालदार अधिकराव चव्हाण (बंडगार्डन वाहतूक विभाग), यांचा विशेष कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आला आणि त्यांना प्रशंसापत्र देण्यात आली.

यावेळी रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, सुनील पांडे, बाळासाहेब रानवडे, आनंद छाजेड, अनिल भिसे, सचिन वाडेकर, गणेश नाईकरे, सौरभ कुंडलिक, बिरू खोमणे, तसेच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डी.एन. सातव, चतुःश्रुंगी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब कोळी, खडकी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळकर, शिवाजीनगर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, डेक्कन वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे तसेच पुणे महापालिका पथ विभागाचे गोजारे आणि अन्य अधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले होते.