पुणे, २० आॅक्टोबर २०२४ : पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघातून भाजप पुन्हा एकदा विद्यमान आमदारांना संधी देणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून रंगलेली होती अखेर आज ही यादी जाहीर झाली आहे. कोथरूड मधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्वती मधून माधुरी मिसाळ आणि शिवाजीनगर मतदारसंघातून सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र खडकवासला आणि पुणे कॅन्टोन्मेंट च्या विद्यमान आमदारांबाबत पुनर्विचार करण्यासाठी नावे जाहीर केलेले नाहीत.
पुणे शहरामध्ये विधानसभेचे आठ आमदार आहेत. त्यापैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या पाच मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर जागा वाटपामध्ये भाजपच्या वाट्याला कसबा विधानसभेची सीट येणार आहे अशा सहा ठिकाणी भाजपकडून उमेदवार जाहीर केले जातील अशी अपेक्षा होती. पण भाजपने केवळ तीन ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसब्याचे उमेदवारांबाबत पुनर्विचार करण्याचा भाजप नेत्यांचा विचार दिसून येत आहे. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर मतदारसंघात महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवार म्हणून रिंगणात उतरवली जाते याची उत्सुकता लागलेली आहे.
कोथरूड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे व पृथ्वीराज सुतार यांचे नाव चर्चेत आहेत. तसेच भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे आता बंडखोरी करणार का याकडे लक्ष लागलेले आहे. शिवाजीनगर मतदार संघात काँग्रेस तर्फे दत्ता बहिरट आणि सनी निम्हण हे नाव आघाडीवर आहे, मनीष आनंद यांच्या देखील नावाचा विचार होऊ शकतो. पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांचे नाव आघाडीवर आहे. पण काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांनी देखील पर्वती मधून निवडणूक लढण्याचा निर्धार केलेला आहे. ते बंडखोरी करू शकतात अशा स्थितीत आता विरोधकांकडून सत्ताधारी भाजप पुढे कोणाला उमेदवारी दिली जाईल हे पाहावे लागणार आहे.
More Stories
पुणेकरांचा बंडखोरांना ठेंगा, ५७ वर्षात एकाचाही विजय नाही
आपल्यातील राजकीय शत्रुत्वाचा सूड महिलांवर काढू नका – देवेंद्र फडणवीसांचा मविआच्या नेत्यांवर टीका
शरद पवारांच्या व्यंगावर बोलल्याने अजित पवार भडकले, सदाभाऊ खोतांना दिला इशारा