लोणावळा: लोणावळ्यातील सिंहगड इन्स्टिट्यूट या ठिकाणी आंतर महाविद्यालयीन सिंहगड ऑलिंपस बॅडमिंटन २०२५ या स्पर्धेचे उद्घाटन आज करण्यात आले. पुढील पाच दिवस चालणाऱ्या या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ६० खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे विविध महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी एकेरी आणि दुहेरी दोन्ही गटात भाग घेतला, ज्यामध्ये मुले आणि मुली दोघांसाठी सामने आयोजित केले गेले. सिंहगड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे टीम वर्क व खेळाडू वृत्तीचे दर्शन होणार आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूट लोणावळा संकुल संचालक डॉ. एम. एस. गायकवाड यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एस. के.एन सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स चे प्राचार्य डॉ. एम. एस. रोहोकले, काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे प्राचार्य डॉ. शिवाजी देसाई, सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस च्या प्राचार्या डॉ. रुकसाना पिंजारी, एस के एन सी ओ पी, कोंढवा च्या प्राचार्य डॉ मीनल घंटे, सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, चे प्राचार्य डॉ. एस. डी. बाबर, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे प्राचार्या डॉ. अंजली चॅर्टटन, निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सचे प्राचार्य डॉ.व्ही. बी. ढोले, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन अँड कॉम्प्युटर ऍप्लिकेशच्या संचालिका डॉ. विद्या नखाते यांच्यासह स्पोर्ट्स समन्वयक प्राध्यापक अनिरुद्ध कुलकर्णी , प्रा.आदित्य आदाटे आणि प्रा. विशाल राठोड व प्राध्यापकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
More Stories
महावितरण राज्य क्रीडा स्पर्धेत पुणे-बारामती संघाची दमदार कामगिरी; २१ सुवर्ण, ९ रौप्यपदकांची कमाई
अकराव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2025 स्पर्धेस 10 फेब्रुवारीपासून प्रारंभ
महावितरणच्या क्रीडास्पर्धेत कुस्त्यांचा रंगला थरार: पुणे-बारामतीला १० पैकी ६ सुवर्णपदके तर कोल्हापूरला २ सुवर्ण