February 12, 2025

एनइसीसी डेक्कन जिमखाना आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत एकेरीत तातियाना प्रोझोरोव्हा, लिओलिया जीनजीन यांचा अंतिम फेरीत प्रवेश

पुणे, 31 जानेवारी 2025: डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित नॅशनल एग कॉर्डीनेशन कमिटी(एनइसीसी) यांनी प्रायोजित केलेल्या व आयटीएफ, एआयटीए आणि एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली 24व्या एनइसीसी डेक्कन जिमखाना आयटीएफ 75,000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये उपांत्य फेरीत एकेरीत रशियाच्या तातियाना प्रोझोरोव्हा, फ्रांसच्या लिओलिया जीनजीन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट या ठिकाणी सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत अव्वल मानांकीत फ्रांसच्या लिओलिया जीनजीन हिने तिसऱ्या मानांकित हंगेरीच्या पन्ना उदवर्दीचा 6-4, 7-6(2)
असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना १ तास ४८ मिनिटे चालला. सामन्यात पहिल्या सेटमध्ये जीनजीनने चौथ्या गेममध्ये ब्रेक केली व हा सेट ६-४ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला व सामन्यात ६-६ अशी बरोबरी झाली. त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये खेळविण्यात आला. टायब्रेकमध्ये जीनजीनने पन्नाची चौथ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट ७-६(२) असा जिंकून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात रशियाच्या तातियाना प्रोझोरोव्हा हिने सातव्या मानांकित रशियाच्या एलिना प्रिदांकिनाचा 6-2, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरी धडक मारली.

दुहेरीत अंतिम फेरीत चौथ्या मानांकित अलेव्हटीना इब्रागिमोवा व एलेना प्रिडांकिना यांनी दुसऱ्या मानांकित रशियाच्या मारिया कोझीरेवा व इरिना श्यामानोविच यांचा 6-2, 1-6 [10-8] असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील दुहेरीत विजेत्या जोडीला करंडक, 75 डब्लूटीए गुण व 3344डॉलर, तर उपविजेत्या जोडीला करंडक, 49डब्लूटीए गुण आणि 1672डॉलर अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण माजी डेव्हिस कप खेळाडू संदीप किर्तने आणि डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पर्धा संचालक विक्रांत साने यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: एकेरी: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी:
लिओलिया जीनजीन (फ्रांस) [1]वि.वि. पन्ना उदवर्दी[3](हंगेरी)6-4, 7-6(2);
तातियाना प्रोझोरोव्हा(रशिया) वि.वि. एलिना प्रिदांकिना[7](रशिया) 6-2, 6-2;

दुहेरी: अंतिम फेरी:
अलेव्हटीना इब्रागिमोवा /एलेना प्रिडांकिना [4]वि.वि.मारिया कोझीरेवा [2]
/इरिना श्यामानोविच 6-2, 1-6 [10-8]